पिंपळनेर येथे भिंत कोसळून एकाचा मृत्यू

0

पिंपळनेर / पिंपळनेर येथील न्हावीहुडा येथे घराचे बांधकाम सुरु असतांना अचानक भिंत कोसळल्याने मजूराचा मृत्यू झाला. याबाबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, पिंपळनेर येथील न्हावीहुडा येथे सुभाष जगताप आणि अनिल जगताप यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. बांधकाम दरम्यान अचानक सामाईक भिंत मजूर नुरखॉ लालखॉ पठाण (वय50) याच्या अंगावर कोसळली.

त्याखाली दबून नुरखॉ पठाण याचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली.

 

LEAVE A REPLY

*