रेल्वे स्टेशन रोडवरील अतिक्रमणधारकांना दुसर्‍या टप्प्यात घरकुल वाटप

0

धुळे । दि.23 । प्रतिनिधी-शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील अतिक्रमणधारकांना दुसर्‍या टप्प्यात साक्री रोडवरील यशवंत नगरात आज घरकुलांचे वाटप करण्यात आले.

गेल्या महिन्यात रेल्वे स्टेशन रोडवरील अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने हटविले होते.

त्यानंतर अतिक्रमणधारकांनी पुनर्वसन व्हावे म्हणून महापालिकेसमोर पाच दिवस ठिय्या आंदोलन केले होते. त्याची दखल घेवून मोहाडी व यशवंतनगरातील घरकुले देण्यास महापालिकेने अनुकूलता दाखविली होती.

त्यानुसार महापालिकेने अतिक्रमणधारकांकडून घरकुलांसाठी अर्ज भरुन घेतले. पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात घरकुलांचे वाटप नुकतेच करण्यात आले.

त्यानंतर आज दुसर्‍या टप्प्यात अतिक्रमणधारकांनी महापालिका प्रशासनाने घरकुलाचे वाटप केले. अजून काही अतिक्रमणधारक पुनर्वसनापासून वंचित आहेत. त्यांचे लवकरच पुनर्वसन केले जाईल असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*