कापडणेच्या संजना पाटीलला सुवर्णपदक

0

कापडणे । प्रतिनिधी-येथील रहिवाशी व धुळे येथील तु.ता.खलाणे माध्यमिक विद्यालयातील नववीतील विद्यार्थीनी संजना जितेंद्र पाटील या विद्यार्थिनीने हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेत सुवर्णपदक पटकावले. तिला नुकतेच सुवर्णपदक आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

महात्मा गांधी राष्टभाषा हिंदी प्रचार संस्था, पुणेतर्फे अखिल भारतीय राष्टभाषा विभूषण परिक्षा नुकतीच घेण्यात आली. यात तु.ता.खलाणे विद्यालयातील संजना जितेंद्र पाटील या विद्यार्थ्यींनीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवित सुवर्ण पदक मिळविले.

शाळेतर्फे ही संजनाचा भव्य सत्कार करण्यात आला. येथील छायाचित्रकार जितेंद्र सुदाम पाटील यांची संजना ही मुलगी आहे. संजनाचे विद्यालयाचे प्राचार्य आर.एस.बाविस्कर, उपमुख्याध्यापक श्री.सुर्यवंशी, हिंदी शिक्षक श्री.पावरा, एस.यु.सुर्यवंशी, श्री.गायकवाड आदींसह शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन लाभले.

याआधी संजनाने राज्य एड्स नियंत्रण संस्था व मनपाच्या आयसीटीसी कक्षांतर्फे घेण्यात आलेल्या निबंध व घोषवाक्य स्पर्धेतही जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला होता.

तीच्या या यशाबद्दल तीच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करून संजनाने विजयाची परंपरा कायम ठवावी, अशी अपेक्षा तिच्याकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*