धूम टोळीने वृद्धाला लुबाडले

0
धुळे / शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या वृध्दाच्या पिशवीतून धूम टोळीने 70 हजार रुपये लांबविले. याबाबत आझादनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
चिंचखेडा ता. धुळे येथील अंकुश गटा देसले (वय60) यांच्या मुलाचे लग्न असल्याने ते त्यांची पत्नी व मुलीसोबत लग्नाचा बाजार करण्यासाठी धुळ्यात आले होते.

त्यांनी शहरातील देना बँकेतून खरेदीसाठी पैसे काढले होते. त्यानंतर बाजारही केला. 70 हजाराची रोकड पिशवीत ठेवून अंकुश देसले हे कुटुंबासोबत पायी जात असतांना बॉम्बे लॉज ते गजानन टी स्टॉल या दरम्यान मोटार सायकलीवर दोन आले व त्यांनी देसले यांच्या हातातील पिशवी खेचून नेली.

त्यावेळी त्यांनी आरडाओरड केली परंतू मोटार सायकलीवरुन चोरटे पळून गेले. याबाबत आझादनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

LEAVE A REPLY

*