शिरपूर येथे पालिकेतर्फे ‘डस्ट-बीन’ वाटप

0

शिरपूर । दि.21 । प्रतिनिधी-शहरातील रामसिंगनगर येथे स्वच्छ सर्वेक्षण-2018 अंतर्गत शिरपूर वरवाडे नगरपरिषदेतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात डस्ट-बीन वाटप करण्यात आले.

शहरातील रामसिंगनगर येथे प्रातिनिधीक स्वरुपात डस्ट-बीन वाटप कार्यक्रम घेण्यात आला. संपूर्ण शहरभरात 14 हजार डस्टबीन घरपोच तसेच हॉटेल, नाश्ता रेस्टॉरंट व खानावळी येथे 500 डस्ट-बीन वाटप करण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आले आहे.

कार्यक्रमास व्यासपीठावर लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, कक्कूबेन पटेल, किरनबेन पटेल, सामाजिक कार्यकर्ते भरतसिंग गिरासे, बांधकाम सभापती सौ. संगिता देवरे, आरोग्य सभापती सलिम खाटीक, नगरसेविका सौ.हेमलता गवळी, नगरसेविका नजिराबी शेख, नगरसेवक देवेंद्र राजपूत, नगरसेवक चंद्रकांत कोळी, नगरसेविका लक्ष्मीबाई भिल, परिसरातील अनेक नागरीक, महिला व पुरुष, युवावर्ग, न.पा.अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल यांनी यावेळी सांगितले की, महिला व पुरुष, नागरिकांनी सुका व ओला कचरा स्वतंत्रपणे डस्टबीनमध्ये टाकून घंटागाडीतच टाकावा. उघड्यावर शौचास न बसता वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करायचा आहे. तसेच शासनाच्या आदेशानुसार नागरीक ‘अ‍ॅप’ डाऊनलोड करुन घेवून स्वच्छतेच्या मोहिमेसाठी त्याचा वापर करावा. शहर सौंदर्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असावे.

उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनीही आपल्या मनोगतातून स्वच्छ सर्वेक्षण-2018 बद्दल सविस्तर विवेचन करुन सर्वांनी शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न करावे, असे सांगून स्वच्छ व सुंदर शिरपूरची परंपरा कायम टिकवावी आणि शिरपूरचा नावलौकीक वाढवावा, असे त्यांनी नागरिकांना आवाहन केले.नगरसेवक देवेंद्र राजपूत व नगरसेविका सौ.हेमलता गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात भरतसिंग गिरासे यांनी स्वच्छता राखण्याबाबत आवाहन केले. कार्यक्रमास नगरसेवक देवेंद्र राजपूत, सुनिल जैन, पौर्णिमा पाठक, स्वच्छता पर्यवेक्षक जितेश पाटील, स्वच्छता निरीक्षक अहिरे, दिपाली साळुंखे, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचलन सौ. दिपाली साळुंखे यांनी केले.

LEAVE A REPLY

*