विवाहितेला मारहाण: गुन्हा दाखल

0

धुळे । दि.21 । प्रतिनिधी-प्लॉट घेण्यासाठ माहेरुन दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ करुन विवाहितासह तिच्या आई-वडीलांना मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सिंहस्थ नगरात राहणारी जयश्री जगन्नाथ दाभाडे या विवाहितेने माहेरुन प्लॉट घेण्यासाठी दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ करुन विवाहिता व तिच्या आई-वडीलांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली, अशी फिर्याद शहर पोलिस ठाण्यात जयश्री जगन्नाथ दाभाडे यांनी दिली.

भादंवि 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे जगन्नाथ हरलाल दाभाडे, मिराबाई हरलाल दाभाडे, हरलाल धुडकू दाभाडे, सतीष दाभाडे, कल्पनाबाई दाभाडे, दिलीप पारधी, रत्नाबाई पारधी, वसंत पारधी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

*