स्वप्निलकुमार सूर्यवंशी यांचे यश

0
कापडणे, ता.धुळे / यूपीएससीचा निकाल आज (दि.31) घोषित झाला. यात कौठळ (ता.धुळे) येथील स्वप्निलकुमार सुनील सूर्यवंशी-पाटील यांनी यश मिळविले.
आयएएस, आयपीएस व आयएफएससाठी एक हजार 99 उमेदवारांची शिफारस यूपीएससीने केली असून यात स्वप्निल सूर्यवंशी यांनी स्थान मिळविल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यात स्वप्निलकुमार सूर्यवंशी यांनी 670 रैन्कने प्राविण्य मिळविले आहे. ते कौठळचे उपसरपंच व आमराळे विद्यालयातील माध्यमिक शिक्षक सुनील हिलाल सूर्यवंशी व कापडणे जि.प.शाळा क्र.दोनमधील शिक्षिका अनिता बागुल यांचे चिरंजीव आहेत.

स्वप्निलकुमार सूर्यवंशीचे प्राथमिक शिक्षण खोंडामळी येथील जि.प.शाळेत तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण जयहिंद विद्यालयात झाले.

2008 मध्ये 12 वी परीक्षेत ते खान्देशात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. मुंबईच्या व्हीजीटीआय महाविद्यालयातून त्यांनी बी.टेक.(कॉम्प्युटर)ची अभियांत्रिकी पदवी घेतली.

त्यानंतर दिल्लीच्या एका नामांकित कंपनीत 11 लाखांच्या पॅकेजने त्यांची निवड झाली परंतु पहिल्यापासून अधिकारी होण्याच्या स्वप्नाने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही व घसघशीत पगाराची नोकरी सोडून त्यांनी यूपीएससीची तयारी सुरु केली व स्वप्निल सूर्यवंशी यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले.

कौठळसारख्या लहानशा खेड्यातून यूपीएससीत यश मिळविल्याने स्वप्निलकुमार सूर्यवंशीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

*