मुलींचे घटणारे प्रमाण खूप चिंतेची बाब – आ.अमरिशभाई पटेल

0

शिरपूर । दि.20 । प्रतिनिधी-गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे आहे. यासाठी भविष्याचा विचार करणारी पिढी घडली पाहिजे.व्यसनाधीनता ही येणार्‍या पिढीतील मोठी गंभीर समस्या आहे.

सोशल मीडियामुळे चांगले कमी आणि वाईटच जास्त शिकले जात आहे. यासाठी प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. समाजातील मुलींचे घटण्याचे प्रमाण खूपच चिंतेची बाब आहे. मुलीला गर्भातच मारणे हे सर्वात मोठे पाप आहे.

कारण जन्मदात्रीला मारून कोणीही सुखी राहू शकत नाही. जीवनात कितीही मोठा पुरस्कार मिळाला तरी समाजाने केलेला गौरव माणसाच्या सदैव लक्षात राहतो.समाजाने गौरव करावा यासाठी माणसाने चारीत्र्य संपन्न व चांगले शिक्षण घेतले पाहिजे असे प्रतिपादन आ.अमरिशभाई पटेल यांनी व्यक्त केले.

शिरपूर शहरातील गुर्जर भवन येथे लेवा गुजर उन्नती मंडळातर्फे स्नेहमिलन व गुणगौरव समारंभ झाला. अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल होत्या.

व्यासपीठावर माजी शिक्षणमंत्री आ. अमरिशभाई पटेल, शहादयाचे नगरसेवक मकरंद पटेल,जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, कि.वि.प्र. संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, गुर्जर परिषदेचे अ‍ॅड.शांताराम महाजन, दोडे गुर्जर समाजाचे अध्यक्ष मंगलसिंग चौधरी, बडगुर्जर समाजाचे उपाध्यक्ष ईश्वर बडगुजर, उन्नती मंडळाचे अध्यक्ष डॉ.काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिव डॉ.अर्जून पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल म्हणाल्या की, गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक असल्याची बाब गौरवपूर्ण आहे. महिला आता पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहे.

चांगला समाज घडविण्यासाठी स्री-पुरुषांनी बरोबरीने काम केले पाहिजे. नगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेस सर्वांनी सहकार्य केले पाहिजे.महिलांसह सर्वांनीच सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे.

घरातील कचरा नगरपालिकेच्या घंटागाडीतच टाकला गेला पाहिजे, याकडे जाणीव पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे असेही सौ.जयश्रीबेन पटेल म्हणाल्या. गुणगौरव समारंभात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला.

ज्येष्ठ मंडळींना समाज जीवन गौरव पुरस्कार देवून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. समाज दर्शिकेचेही प्रकाशन नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.

जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी – स्व.प्राचार्य एस.एम.पटेल,स्व. नारायण रामचंद्र चौधरी, माजी प्राचार्य एस.आर.चौधरी, माजी बीडीओ जी.आय.पटेल, माजी प्राचार्य स्व. बी.एन.गुजर,माजी प्राचार्य स्व. एस.के.गुजर, विजय सुदाम पटेल यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी लेवा गुजर उन्नती मंडळाचे अध्यक्ष डॉ.काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष माधवरावपाटील, सचिव डॉ.ए.पी.पटेल, पुनाभाई चौधरी, प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, ओ.जी.पाटील, बन्सीभाई चौधरी, विनोद पटेल, भावेश पाटील, अशोक पाटील,के.एल.पाटील,अनिल पटेल, संजयगुजर, महेंद्र पटेल, गिरीश पटेल, महेश्वर चौधरी यांच्यसह समाज बांधव यांनी मेहनत घेतली.सूत्रसंचलन एन.बी.पाटील,डॉ.अनिलपाटील,सोनाली पाटील,डॉ.बिनल पटेल यांनी केले.

LEAVE A REPLY

*