आदिवासी एकता परिषदेतर्फे कार्यकर्ता प्रबोधन शिबिर

0

धुळे । दि.20 । प्रतिनिधी-बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी एकता परिषद व विद्यार्थी शाखेतर्फे एक दिवसीय कार्यकर्ता प्रबोधन शिबीर शहरातील जेष्ठ नागरिक भवन येथे झाले.या शिबीराला देशदूतचे जिल्हा प्रतिनिधी विलास पवार, आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा सचिव दिपक अहिरे, बालाजी गवळी, विशाल मावळी, विद्यार्थी शाखेचे विभागीय अध्यक्ष रोशन गावीत आदी उपस्थित होते.

आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा सचिव दिपक अहिरे यांनी सांगीतले की, आदिवासी समाजाला पिडीत व शोषित समाज म्हणूनच ठेवावे, अशीच परिस्थिती व्यवस्थेने निर्माण केली आहे.

आदिवासींना अनेक सुविधा देण्याचा दावा शासन नेहमीच करते. परंतू आदिवासींसाठी दिलेल्या सुविधा दुसरेच लाटून नेतात, असे अहिरे म्हणाले. विद्यार्थी शाखेचे विभागीय अध्यक्ष रोशन गावीत यांनी प्रस्तावन केली.

आदिवासी समाज आज विविध क्षेत्रात कार्यरत आहे. आदिवासी नोकरदारही आहे आणि मजूरही. ह्या दोन्ही घटकाना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास समाजातील अनेक समस्यांवर चर्चा होऊन विचारांचे आदानप्रदान करून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करता येईल, असे रोशन गावीत म्हणाले.

आदिवासी विद्यार्थी, नोकरदार व मजूर विविध प्रशनंसाठी एकत्र आल्यास व सक्षम सामाजिक कार्यकर्ते तयार झाल्यास अशा शिबीरांचा हेतू साध्य होईल, असेही त्यांनी सांगीतले.

शिबीरात आदिवासी विद्यार्थी व नोकरदार यांच्यावरील अन्यायाची चर्चा झाली. कार्यक्रमात उपस्थित बालाजी गवळी यांनी आदिम संस्कृती तथा त्याची या काळातदेखील कशी उपयुक्तता आहे, यावर मार्गदर्शन केले.

साक्री पंचायत समितीचे सदस्य विलास मावळी यांनी आपला हक्क मिळवायचा असेल तर चांगले राजकारणी समाजात तयार व्हायला हवेत, असे प्रतिपादन केले.

यावेळी विलास पवार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.समाजात चांगले सामाजिक कार्यकर्ते घडले पाहीजेत, असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमात विद्यार्थी, सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभू साबळे, शांतू भोसले, मंगलसिंग सुर्यवंशी, विशाल बहिरम आदींनी मेहनत घेतली. या शिबीराला युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती.

LEAVE A REPLY

*