ग्रामसेविकेचा विनयभंग

0

धुळे । दि.20 । प्रतिनिधी-ग्रामसेवक पतपेढी निवडणुकीतून माघार घेण्याच्या कारणावरुन 33 वर्षीय ग्रामसेविकाचा विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांविरुध्द पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, ग्रामसेवक पतपेढीच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या कारणावरुन 33 वर्षीय ग्रामसेविकेच्या मोबाईलवर उमाकांत बोरसे याने लज्जा उत्पन्न होईल, असे बोलून विनयभंग केला.

याबाबत पीडिताने पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 354ड (2), 504, 506, 34 प्रमाणे उमाकांत बोरसे, पी.टी.भामरे, एस.बी.सोनवणे, राहूल देवरे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि सविता भांड या करीत आहेत.

LEAVE A REPLY

*