जवानांनी पाहिला ‘सचिन द बिलीयन ड्रीम’

0
धुळे / सचिन द बिलीयन ड्रीम हा चित्रपट बल गट क्र. 6 चे समादेशक चंद्रकांत गवळी यांनी त्यांच्या अधिकारी व जवानांना बुधवारी सकाळी चित्रपटगृहात नेऊन दाखविला. यामुळे जवान तणावमुक्त झाले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले आहे.
एसआरपी अधिकारी व जवान म्हटला म्हणजे नेहमीच कामाचा ताणतणाव असतो. दंगलग—स्त आणि नक्षलग—स्त भागात कर्तव्य बजावण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. बंदोबस्तासाठी गेलेल्या जवांनाना अनेक महिने आपल्या कुटुंबापासून दूर रहावे लागते.
निवडणुका असो किंवा कायदा व सुव्यवस्थेची बिकट परिस्थितीचा प्रश्न अगोदर एसआरपी जवानांनाच तेथे परिस्थिती हाताळावी लागते.
परिणामी आपला जीव धोक्यात घालून हे जवान आपले कर्तव्य बजावतात. या कामाच्या तणावातून त्यांनाही थोडासा विरंगुळा हवा असतो.

याचाच विचार करुन समादेशक चंद्रकांत गवळी यांनी बुधवारी सकाळी 9 वाजता शहरातील मनोहर चित्रपट गृहात भारतरत्न सचिन तेंडूलकर याच्या जीवनावर आधारीत सुरू असलेला सचिन द बिलीयन ड्रीम हा चित्रपट स्वत:ही पाहीला आणि आपल्या अधिकारी व जवानांनाही दाखविला.

खडतर प्रसंगी कसे वागावे ? याची शिकवण या चित्रपटातून जवानांना घेता येईल हा यामागे उद्देश होता.

त्यांच्यात स्फुर्ती व आनंद निर्माण होण्याचा उद्देश समादेशक गवळी यांचा सफल झाल्याचे जवानांच्या चेहर्‍यावरुन दिसून येत होते.

LEAVE A REPLY

*