१६ लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप रेल्वेस्टेशन अतिक्रमणधारकांचे महापालिकेतर्फे पुनर्वसन

0
धुळे |  प्रतिनिधी :  शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनास महापालिकेने सुरुवात केली आहे. १६ लाभार्थ्यांना प्रशासनाने घरकूल वितरण प्रमाणपत्र दिले असून त्यांनी साक्री रोडवरील यशवंत नगरात घरकुलांचा ताबा घेतला आहे तर १५ लाभार्थ्यांना त्यांच्या मागणीनुसार मोहाडी येथील घरकूल देण्यात येणार आहे, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मागच्या महिन्यात रेल्वेस्टेशन रोडवरील अतिक्रमणे महापालिका प्रशासनाने काढली. त्यानंतर या अतिक्रमणधारकांनी पुनर्वसन होण्यासाठी महापालिकेसमोर पाच दिवस ठिय्या आंदोलन केले होते. त्यादरम्यान अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन केले जाईल, त्यांना घरकुले वाटप करण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

त्यानंतर अतिक्रमणधारकांकडून घरकुलांसाठी अर्ज भरण्यात आले. त्या अर्जांची छाननी करुन लाभार्थ्यांची यादी महापालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यात जाहीर केली. त्यानुसार लाभार्थ्यांना घरकुलाचे वितरण करण्यात येत आहे.

काही लाभार्थ्यांनी शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगरातील घरकुलांचा ताबा घेतला आहे. टप्प्याटप्प्याने सर्व अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन केले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापालिका प्रशासनाने घरकुलासाठी जाहीर केलेल्या यादीवर आक्षेप शिष्टमंडळाने घेतला. त्यानंतर उपायुक्तांनी नव्याने यादी जाहीर केली जाईल, असे आश्‍वासन शिष्टमंडळाला काल दिले होते.

LEAVE A REPLY

*