मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचे तीन महिन्यात भूमीपूजन : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे

0
धुळे |  प्रतिनिधी :  मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचे स्वप्न भारतीय जनता पक्षाच्या सरकारने साकार केले असून यासाठी तीन वर्ष अथक पाठपुरावा केला. अखेर त्याला यश आले असून रेल्वे मार्गाचे भूमीपूजन येत्या तीन महिन्यात होईल, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ना.डॉ.सुभाष भामरे हे आज जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ना.भामरे हे बोलत होते. पत्रकार परिषदेला भाजपाचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी नगरसेवक हिरामण गवळी, विनोद मोराणकर, प्रा.अरविंद जाधव, बापू खलाणे, चंद्रकांत गुजराथी, विजय पाच्छापूरकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना ना.सुभाष भामरे म्हणाले की, मे २०१४ ला खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचा प्रश्‍न हाती घेतला. त्यावेळी रेल्वे मार्गाला मंजुरी मिळालेली नाही, अशी माहिती प्राप्त झाली. त्यानंतर तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडे या प्रश्‍नासाठी पाठपुरावा केला.

त्यानंतर २०१६ च्या अर्थसंकल्पात मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचा समावेश करण्यात आला. रेल्वे मार्गासाठी येणार्‍या खर्चासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार झाला व रेल्वे इन्फास्ट्रक्चरची स्थापना करण्यात आली, परंतु त्याला मध्यप्रदेश सरकारने प्रतिसाद दिला नाही.

त्यानंतर रेल्वे व शिपींग मंत्रालय एकत्रित येवून मार्ग काढता येईल, असा प्रस्ताव पुढे आला, असे ना.डॉ.भामरे यांनी सांगितले.

शिपींग मंत्रालयाचा डीपीआर नऊ हजार कोटीवरुन सहा हजार कोटीवर करण्यात यश आले. याला रेल्वेमंत्री ना.पियुष गोयल व रेल्वे अधिकार्‍यांनी मान्यता दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.

पाठपुरावा केल्यामुळे मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला अंतिम मंजूरी मिळाली आहे. येत्या तीन महिन्यात या रेल्वे मार्गाचे भूमीपूजन होईल, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*