किरण गायकवाडला राज्य स्काऊट पुरस्कार

0

कुसुंबा । दि.15 । वार्ताहर-येथील गांधी अ‍ॅण्ड फुले (तांत्रिक) विद्यालयाचा इ.10 वीचा विद्यार्थी किरण अभिमन गायकवाड यास राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते स्काऊट गाईड पॅव्हेलियन दादर येथे 2015-16 या वर्षातील राज्य पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.

जिल्ह्यातून 169 स्काऊट गाईड उत्तीर्ण झाले. त्यापैकी दोन स्काऊट व दोन गाईड व युनिट लिडर श्रीमती छाया पाटील यांची निवड झाली होती.

त्यांना जिल्हा संघटन आयुक्त संतोष सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व पात्र स्काऊट गाईड यांचे अध्यक्ष जे.यु. ठाकरे, जिल्हा मुख्य आयुक्त मोहन देसले, जिल्हा स्काऊट आयुक्त शांताराम शेंडे, जिल्हा चिटणीस सुरेश सोनवणे, जिल्हा आयुक्त गाईड श्रीमती आशाताई रंधे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त बी.जे. रायते, श्रीमती कविता सोनवणे, शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रविण अहिरे, गटशिक्षणाधिकारी पुष्पराज शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती दंडगव्हाण व केंद्रप्रमुख संजय पवार, खेडे विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्रा.टी.एस. अहिरे, उपाध्यक्ष एस.एस.अहिरे, प्राचार्य ए.एस.वाघ, स्काऊट मास्टर व गाईड कॅप्टन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

*