2 घरफोडे गजाआड ; 4 लाखांचा ऐवज जप्त

0
धुळे  / पोलिसांच्या पथकाने देवपूर भागातील एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणात दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तसेच त्यांच्याकडून सोन्याचांदीचे दागिने व 2 वाहने असा 4 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक एम. रामकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत अनवर खान पठाण आणि विकास उर्फ विक्की मधुकर चौधरी यांना ताब्यात घेतले.
त्यानंतर त्यांना पोलीसी खाक्या दाखवत बोलते केले. या संशयितांनी पशषचम देवपूर परिसरातील चेतन बन्सीलाल शेंडे यांच्याकडे घरफोडी केल्याची कबूली दिली.

या चोरट्यांकडून सोन्याचे मंगलसूत्र, चार अंगठ्या, टोंगल, झुमके, चांदीचे भांडे, समई व इंडिका कार, दुचाकी असा 4 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*