आरटीओ विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करा ! जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0

धुळे । दि.16 । प्रतिनिधी-प्रादेशिक परिवहन विभागातील बेकायदेशीर कामे व भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलिस अधिक्षक, एनएचआय अधिकारी, हायवे ट्रॉफीक अधिकारी, चेक पोस्टवर काम करणारे सद्भाव कंपनीचे प्रमुख अधिकारी, वजनमाप निरीक्षक यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

प्रादेशीक परिवहन विभाग (आरटीओ) मार्फत राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल उपलब्ध होतो. आधुनिक पध्दतीने व करवसुली अधिक होण्याच्या दृष्टीने नेमण्यात आलेली यंत्रणाच भ्रष्टाचार करीत आहे.

भ्रष्टाचारामुळे राज्याला मिळणारा महसूलाचा मोठा भाग अधिकार्‍यांच्या खिशात जात आहे. ट्रक चालकांकडून वसूल होणारा या सर्व पैशांचा भार अखेर सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडत आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलिस अधिक्षक, एनएचआय अधिकारी, हायवे ट्रॉफीक अधिकारी, चेक पोस्टवर काम करणारे सद्भाव कंपनीचे प्रमुख अधिकारी, वजनमाप निरीक्षक यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात पत्रकार हेमंत मदाने, किशोर बाफना, शैलेश पटले आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*