क्रिकेट असोसिएशनच्या शिरपूर संघाला जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद

0

शिरपूर । दि.16 । प्रतिनिधी-शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशन शिरपूर संघाने जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित खुल्या गटाच्या मुलांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धचे विजेतेपद पटकावले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित खुल्या गटाच्या मुलांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा धुळे येथील कुंडाणे मैदानावर घेण्यात आल्या. स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 16 संघानी सहभाग नोंदविला होता. त्या सर्व संघाना नमवून शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशन शिरपूर संघाने प्रथम क्रमांक पटकावला.

सदर संघात तरुण देवरे, जयदेव पाटील, सागर माळी, अनिकेत मोरे, कुणाल गिरासे, प्रफुल्ल धनगर, लोकेश देशमुख, प्रशांत ढोले, विवेक वाणी, दानेश पटेल, हितेश पाटील, आदित्य कुलकर्णी, दिपराज ढोले, दुष्यंत पाटील, फरदीन शेख, रामेश्वर पाटील, भुपेश सोनवणे, सत्येंद्र साळवे यांचा समावेश होता.

क्रिकेट खेळाडूंच्या यशाबद्दल संसथेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, शिरपूर टेक्सटाईल पार्क चेअरमन तथा नगरसेवक तपनभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, बी.सी.सी.आय. संचालक नविन शेट्टी, शिरपूर पिपल्स बँक चेअरमन योगेश भंडारी, मुख्य वित्त अधिकारी नाटूसिंह गिरासे, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, सीईओ डॉ.उमेश शर्मा, सर्व संचालक, मुख्याध्यापक, तालुका क्रीडा सचिव रावसाहेब चव्हाण, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक वर्गाने कौतुक केले.

पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, उपाध्यक्ष लहू पाटील, सचिव राजन चौक, सहसचिव संदीप शिंदे, कार्यकारिणी सदस्य अरूण टिळक, कपिल शेख, नरेंद्र काळमीक, मोहन तरटे, रविंद्र किल्लेदार व पंच इमरान शेख, विनोद मोरे, गुणलेखक सागर शितोळे उपस्थित होते. सदर मान्यवरांनी दोन्ही संघांना चषक देवून खेळाडूंचा गुणगौरव केला. सदर संघाला क्रिकेट प्रशिक्षक फिरोज शेख, राकेश बोरसे, संदिप देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

*