प्रेमसंबंध ठेवून आदिवासी महिलेची फसवणूक

0
धुळे / आदिवासी महिलेशी प्रेमसंबंध ठेवून तिच्याकडील पैसा, मालमत्ता हडप करुन तिची सुमारे 30 लाखांत फसवणूक करून छळ केल्याप्रकरणी शिरपूरात उघडकीस आला आहे.
याबाबत अनिता राजेंद्र पाटील, (पावरा) रा. शिंगावे, ता. शिरपूर या महिलेने शिरपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्याने कथित प्रेमीसह त्याच्या मुलावर आणि इतर दोघांविरुध्द अ‍ॅट्रोसिटीसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पीडित आदिवासी महिला अनिता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या 10 ते 12 वर्षापुर्वी चोपडा तालुक्यातील रहिवाशी असलेल्या राजेंद्र प्रेमचंद पाटील याच्याशी तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले.

यातून ते दोघे चहार्डी ता. चोपडा येथे एकत्र रहात. तिच्या स्वभावाचा फायदा उचलित राजेंद्र पाटील याने तिच्या पगारातील पैसे वेळोवेळी घेतले.

तसेच राजेंद्र पाटील याने प्रितेश राजेंद्र पाटील, माधुरी विनायक चौधरी तिघे रा. गोरगावळे बु. चोपडा, जि. जळगाव आणि नरेंद्र प्रल्हाद पाटील रा. चहार्डी, ता. चोपडा यांच्याशी संगनमत करुन तिच्या पोस्ट खात्यात फिक्समध्ये ठेवलेले दिड लाख रुपये उसनवार घेतले ते पैसे परत केले नाही.

तसेच अनिताच्या नावे असलेला प्लॉट विकून 30 लाखाची फसवणूक केली. पीडित आदिवासी महिला अनिता ही शिंगावे ता. शिरपूर येथील भावाच्या घरी राहण्यास आली.

त्यानंतरही आरोपी राजेंद्र, प्रितेश आणि चौघांनी तिचा मानसिक छळ केला. तु आदिवासी समाजाची असून माझे काही करु शकत नाही, असे म्हणत राजेंद्र आणि साथीदारांनी दि. 9 ते 16 मे दरम्यान अनिताला शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकीही दिली.

महिलेच्या फिर्यादीवरुन शिरपूर शहर पोलिसांनी चौघा आरोपींविरुध्द भादंवि कलम 498 (अ), 448, 420, 406, 323, 504, 506, 34 तसेच अनु. जा.ज.का.क. 3 (4) (आर) (एस) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पीआय वडनेरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*