तालुका पुरवठा निरीक्षकांनी केली चौकशी : कारवाई होणार ?

0

लामकानी । दि.15 । वार्ताहर-लामकानी येथे असलेल्या सरकारमान्य दोन्ही स्वस्त दुकानांबाबत अनेक तक्रारी असल्याने पुरवठा निरीक्षण अधिकारी आर.बी.वसईकर यांनी लामकानी येथे येऊन सदर दुकानदारांची चौकशी केली.

ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच धनंजय कुवर यांच्या उपस्थितीत ग्राहकांनी पुरवठा निरीक्षण अधिकारी आर.बी.वसईकर यांच्यासमोर तक्रारी मांडल्या.

त्यात रेशनकार्ड असून माल दिला जात नाही, यादीत नाव असून माल दिला जात नाही, काही ग्राहकांचे यादीत नाव आहे पण कार्ड नाही.

अशांना ज्यादा भावाने माल दिला जातो, अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या. किरण राघो पाटील, शांतीलाल लोटन पाटील, पांडू गुलाब भिल, मन्यार ईम्रान शब्बीर, संतोष भाऊराव भिल, तुकाराम चैत्राम पाटील, नवसाबाई नामदेव भिल, गोरख माणिक भिल या ग्राहकांनीही तक्रारी मांडल्या असून त्यांच्याकडे बी.पी.एच.चे कार्ड असूनसुध्दा माल मिळत नसल्याच्या तक्रारी दिल्या.

त्यावेळी सरपंच यांनी वेळ आली तर दुकान नं. 136 व 48 दोन्ही दुकानावर कार्यवाही झाली नाही तर त्या दुकानांना कुलूप लावले जाईल व दुसर्‍यात मार्फत माल वितरीत केला जाईल. ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*