आ.अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे दहन

0

धुळे । दि.14 । प्रतिनिधी-शहरातील महाराणा प्रताप चौकात आज सकाळी 11.30 वाजता काही मराठा समाज बांधवांनी आ.अनिल गोटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून आ.अनिल गोटे आणि राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष मनोज मोरे यांच्यात पत्रकयुध्द सुरु आहे. एका पत्रकातून आ.गोटे यांनी मनोज मोरे यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे.

या घटनेच्या पार्श्वभुमिवर आ. गोटे यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज काही मराठा समाज बांधव सकाळी 11.30 वाजता राणा प्रताप चौकात जमले.

यावेळी आ.अनिल गोटे यांचा निेषध नोंदवित प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

आ. गोटे यांच्याकडून मनोज मोरे यांच्यासंदर्भात काढण्यात आलेल्या पत्रकांचा जाहीर निषेध करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

भविष्यात अशा प्रकारचे लिखाण झाल्यास मराठा समाज पेटून उठेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. मनोज मोरे यांच्या पाठीशी समाज बांधव एकदिलाने उभे असून यासाठी तीव्र आंदोलनाच्या तयारीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सकाळी 11.30 वाजता झालेल्या या आंदोलनाप्रसंगी महाराणा प्रताप चौकात अचानक धांदल उडाली. यावेळी तरूणांनी पुतळा दहन करताना आमदार अनिल गोटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मराठा समाजावर अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.

 

 

 

LEAVE A REPLY

*