राजवर्धन कदमबांडे यांनी दिलेल्या निवेदनामागील हेतू तपासा ! लोकसंग्रामची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

0

धुळे । दि.14 । प्रतिनिधी-दि.11 नोव्हेंबर 17 रोजी राजवर्धन कदमबांडे यांनी स्वत: निवेदन देवून आ.अनिल गोटे यांच्या प्रसिध्दीपत्रकाचा आधार घेवून, मनोज मोरे व इतर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. या निवेदनामागील हेतू तपासण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन लोकसंग्राम पक्षातर्फे आज पोलिस अधिक्षकांकडे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहरातील आपल्या राजकीय विरोधकांवर खोट्या केसेस करणे, दोन गटांना एकमेकांमध्ये मारामार्‍या करायला लावणे, धुळे शहर आणि जिल्ह्यातील रॉकेल माफीया, रेती माफीया, भूखंड माफीया, सट्टा मटका, गावठी दारु, गांजा भांग विक्रेते, डांबराचा काळा बाजार करणारे, हायवेवरचे अवैध व्यवसाय करणारे इ. अवैध व्यवसाय करणार्‍यांना राजाश्रय देणे, त्यांच्यात भागीदारी करणे असे प्रकार राजवर्धन कदमबांडे करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

दि.11 नोव्हेंबर 17 रोजी राजवर्धन कदमबांडे यांनी स्वत: निवेदन देवून आ.अनिल गोटे यांच्या प्रसिध्दीपत्रकाचा आधार घेवून, मनोज मोरे व इतर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच ते विशिष्ट सामाजिक संघटनांना पुढे करुन मनोज मोरे यांच्या जीवितास धोका असल्याचे चित्र निर्माण करीत आहेत.

राजवर्धन कदमबांडे आणि मनोज मोरे यांचा इतिहास बघता सदर निवेदन देण्यामागचा त्यांचा हेतू तपासण्याची गरज आहे. आ.अनिल गोटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकामध्ये मनोज मोरे वा इतर कोणासही जीवे मारण्यासंदर्भात काही वक्तव्य केलेले नाही.

तरीदेखील कदमबांडे यांनी इतर पदाधिकार्‍यांना सोबत घेवून आ. अनिल गोटेंपासून जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे, त्यांचा असे सांगण्याचा हेतू काय?

असा सवाल लोकसंग्रामने उपस्थित केला आहे. उद्या मोरे यांच्याबाबतीत काही घटना घडल्यास त्याचे खापर आ. अनिल गोटेंवर फोडायचे असा त्यामागचा त्यांचा हेतू असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे आ. अनिल गोटे यांच्यापासून राष्ट्रवादी शहराध्यक्ष मनोज मोरे वा इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या जीवीतास धोका असल्यासंदर्भात कदमबांडे यांनी दिलेल्या निवेदनामागचा हेतू तपासावा, असे निवेदात म्हटले असून निवेदनावर तेसज गोटे, दिलीप साळुंखे, प्रशांत भदाणे, अमोल सुर्यवंशी, संजय बगदे, डॉ. अनिल पाटील, मनोज वाल्हे, दिपक जाधव, जावेदभाई किराणा, प्रकाश महानोर, छोटू गवळी, मयुर खैरनार, सचिन सूर्यवंशी, योगेश शिंपी, भोला गोसावी, वामन मोहिते, नाना पाठक, भैय्या बच्छाव, खलील भाई, नंदु भामरे, जिरेकर मामा, सचिन पोतेकर, संजय ठाकरे, सुनिल चौधरी, सोमनाथ चौधरी, विजय भोपे, नरेश सोनार, शकिल भाई, जगदीश भदाणे, विशाल चित्ते, सोनू माळी, शरद बोरसे, गोपी चौधरी, बापू काटकर, रणजीत बच्छाव यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

LEAVE A REPLY

*