जिल्ह्यात बालदिन उत्साहात साजरा

0

धुळे । दि.14 । प्रतिनिधी-माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात येवून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच शहरातील विविध शाळांमध्ये यानिमित्त बालदिन साजरा करण्यात आला.
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. शहरासह परिसरात आज बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

पिंपळादेवी विद्यामंदिर – येथील मोहाडी उपनगरातील श्री.पिंपळादेवी प्राथमिक विद्यामंदिरात पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय ठाकरे हे होते. यावेळी उपशिक्षिका सुजाता आवाळे यांनी नेहरुंच्या कार्याची माहिती दिली. यावेळी ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदराज सोनवणे यांनी केले.

महापालिकेत आदरांजली – महापालिकेत पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. महापौर सौ.कल्पना महाले यांनी नेहरुंच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी महिला बालकल्याण समितीच्या सभापती इंदुताई वाघ, महेंद्र शिरपूरकर, चंद्रशेखर बाविस्कर आदी उपस्थित होते.

सावता माळी शाळा – शहरातील सुपडूआप्पा कॉलनीतील सावता माळी प्राथमिक शाळा व आदित्य बालविकास मंदिर येथे बालदिन साजरा करण्यात आला. पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक मीना अहिरे यांनी केले. तर प्रतिभा बाविस्कर, भारती वाघ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी गिते सादर केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दशरथ महाले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मृणालिनी बाविस्कर, मनिषा रोकडे, संगीता पवार, नितीन भदाणे यांनी परिश्रम घेतले.

नॉर्थ पॉईंट स्कूल – येथील नॉर्थ पॉईंट स्कूलमध्ये मिस इंडिया नन्स सिंग यांच्या उपस्थितीत बालदिन साजरा करण्यात आला. ओल्ड इज गोल्ड हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकार सादर केले. त्यात जिनल संदीप पाटील हिने मॉडेलिंगमध्ये सुवर्णपदक तसेच धैर्य परदेशी याने नृत्यात तर अचल बंग याने गायन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. मनन अग्रवाल याने ब्रांझ पथक पटकावले. या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार मिस इंडिया नन्स सिंग यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्या सौ.ममता चौधरी या उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

*