Type to search

maharashtra आवर्जून वाचाच धुळे

होलिकोत्सवाची तयारी सुरु

Share
धुळे ।  प्रतिनिधी :  होलिकोत्सव एका दिवसांवर येवून ठेपल्यामुळे शहरातील बाजारपेठ सजली असून बाजारपेठेत विविध प्रकारातील रंग, पिचकारी, कलर टँक, मुखवटे, रंगीबेरंगी विविध आकारातील टोप्या, कार्टुन आणि प्राण्यांच्या मास्क, छोटा भीमच्या पिचकारी बाजारपेठेत दाखल झाले आहेत. यंदा रंग व पिचकार्‍यांच्या किंमतीत वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

होळी, धुलीवंदन अवघ्या एक दिवसांवर येवुन ठेपल्याने शहरात रंगोत्सवाची तयारी सुरु झाली आहे. विविध रंग, पिचकारी, कलर टँक, मुखवट्यांनी दुकाने सजली आहेत. पंखावाला आणि लाईटवाला चेहरा मुलांना पसंत पडत आहे. रंगीत केसांचे विग व त्याला जोडलेला मुखवटा सध्या बाजारात नवीन आला आहे. डेंजरफेस मास्क, दबंग स्टाईल गॉगल, चायना गॉगलही यंदा बाजारात नवीन स्वरूपात दाखल झाले आहेत. कापड, प्लास्टिक, लाकुड, कलर फ्लोरेसन्ट यापासून तयार केलेल्या विविध वस्तू शहरातील बाजारात दाखल झाल्या आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत विविध उत्पादनांच्या दरांमध्ये यंदा 20 ते 25 टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. कलर स्प्रे, हर्बल गुलाल, हर्बल लिक्वीड, मॅजिक कलर अशा विविध प्रकारांतील रंगही विक्रीसाठी दाखल झाली आहेत. ग्राहकांनी खरेदीला सुरूवात केल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले आहे. लहानांसह मोठ्यांना देखील होलिकोत्सवाचे वेध लागले आहे. यासाठी बाजारपेठतही सज्ज झाली आहे. बाजारात विविध रंग, त्यातही केमिकल युक्त व इकोफ्रेंडली असे प्रकार आहेत.

केमिकल युक्त रंगामध्ये हिरवा, गुलाबी, लाल, सोनेरी, चंदेरी आदी रंगांचा समावेश आहे. यांचे दर यंदा आठ टक्क्यांनी वाढले आहेत. इकोफ्रेडली रंगाचे दर मात्र स्थिर आहेत. तरीही केमिकल युक्त रंगांना अधिक मागणी आहे. तसेच रंगीत केसांचे विग व त्याला जोडलेला मुखवटा सध्या बाजारात नवीन आला आहे. डेंजरफेस मास्क, दबंग स्टाईल गॉगल, चायना गॉगलही यंदा बाजारात नवीन स्वरूपात दाखल झाले आहेत.

कापड, प्लास्टिक, लाकुड, कलर फ्लोरेसन्ट यापासून तयार केलेल्या विविध वस्तू मुंबई, दिल्ली येथून शहरातील बाजारात दाखल झाल्या आहेत. कलर स्प्रे, हर्बल गुलाल, हर्बल लिक्वीड, मॅजिक कलर अशा विविध प्रकारातील रंगही विक्रीसाठी दाखल झाले आहेत. तसेच बाजारपेठेत विविध आकाराच्या चायनामेड पिचकारी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

साधारण 30 ते 70 रूपयांपर्यंत मिळतात. त्यांच्या किंमतीतही 7 टक्के वाढ झाली आहे. तसेच 10 ते 25 रूपयांपर्यंत चायना मेड गॉगलही बाजारात विक्रीला आहेत. एक लिटरची डोलची 70 रूपये तर अर्धा लिटरची डोलची 50 रूपयांना विक्रीला आहे. होळीला हारकंगण देण्याची पध्दत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हारगंणाच्या विक्रीमध्ये तब्बल 50 टक्क्यांची वाढ होणार असल्याचा प्राथमिक अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.

होलिकोत्सवात सुरक्षा बाळगा

होळी पेटविण्यासाठी मोकळ्या जागेचा वा मैदानाचा वापर करावा. रंग खेळतांना वीज खांब, वीजवाहिन्या, विद्युत उपकरणांशी स्पर्श, संपर्क होणार नाही याबाबत सुरक्षा बाळगावी असे आवाहन महावितरणने केले आहे.

वसंत ऋतुचा स्वागतोत्सव होळी, रंगपंचमी सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. आनंदोत्सव हे अपघातविरहीत साजरे व्हावे त्यासाठी वीज सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. होळीच्या ज्वालांनी वीजवाहिन्या वितळून जीवंत तार खाली पडून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे वीज खांब, वीजवाहिन्या व वितरण रोहित्रांजवळ होळी पेटविणे टाळावे.

होळी पेटवितांना शक्यतो मोकळया जागेचा वापर करा. विजेच्या बाबतीत आपली एक चुक प्राणांतिक अपघातास कारणीभूत ठरू शकते. रंगोत्सव साजरा करतांना पाण्याचे फवारे वीजवाहिन्यापर्यंत उडणार नाहीत.

रंग भरलेले फुगे फेकतांना ते वीजेचे खांब, वीजवाहिन्यांना लागणार नाहीत, वीजेच्या खांबाभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी. त्यासाठी वीज वितरण यंत्रणेपासून लांब अंतरावर रंग खेळावा. रंग खेळतांना ओल्याचिंब हाताने वीज खांबाला स्पर्श टाळावा. घरात वीज मिटर, विजेचे प्लग, वीजतारा व वीज उपकरणे पाण्याच्या संपर्कात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, ओल्या हाताने वीजेची उपकरणे चालू वा बंद करणे कटाक्षाने टाळावे असेही आवाहन महावितरणने केले आहे.

अशी काळजी घ्या

होळी वीज वितरण यंत्रणेपासून लांब अंतरावर पेटवा. होळी जाळतांना तिचा स्पर्श वीज वाहिन्यांना होणार नाही, ही दक्षता घ्यावी. वीज वाहिन्या, वितरण रोहित्रावर पाणी फेकणे टाळावे. रंग खेळतांना ओल्या हाताने वीज उपकरणांना स्पर्श टाळावा, वीज खांबाभोवती पाण्याचा निचरा होऊ देऊ नका. असे आवाहन महावितरणने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!