मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय आ.अनिल गोटेंच्या निषेधाचा ठराव

0

धुळे । दि.13 । प्रतिनिधी-मराठा समाजाच्या बैठकीत मराठा समाजाच्या महिलेची बदनामी केल्याने तसेच पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आ. अनिल गोटे यांच्या निषेधाचा ठराव बैठकीत करण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चाची बैठक मराठा सेवा संघाच्या कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीला डॉ.संजय पाटील, कमलेश देवरे, संजय बोरसे, राजकुमार बोरसे, निंबा मराठे, रणजितराजे भोसले, अमोल मराठे, प्रशांत भदाणे, कुणाल पवार, नीलेश काटे, सुभाष पाटील, कुणाल मोरे, सुधीर मोरे यासह समाज बांधव उपस्थित होते.

या बैठकीत समाजातील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. मनोज मोरे यांना जीवेठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल या बैठकीत निषेध व्यक्त करण्यात आला. दि.14 रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रामकुमार यांना निवेदन देण्याचा ठरावही करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*