धुळ्यात भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने !

0

धुळे । दि.11 । प्रतिनिधी-बदनामीकारक व लज्जा वाटेल असे पत्रक छापून वाटप केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे महानराध्यक्ष व नगरसेवक मनोज मोरे यांच्याविरुध्द आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माजी नगराध्यक्षा सौ.हेमाताई गोटे यांनी आझादनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझेे पती आ.अनिल गोटे व राष्ट्रवादीचे महानराध्यक्ष व नगरसेवक मनोज दादासाहेब मोरे यांच्यात आपसात राजकीय वैमनस्य आहे.

यातून मनोज मोरे यांनी बदनामीकारक व लज्जा वाटेल असे पत्रक छापून त्याचे वाटप दि.9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता शहरातील ग.नं.4, बांबू गल्लीत केले. मनोज मोरे यांना असे पत्रक वाटू नका, असे सांगितले असता त्याचा राग येवून मोरे यांनी वाईट शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले असून आझादनगर पोलिस ठाण्यात मनोज मोरे यांच्याविरुध्द भादंवि 292, 509 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती मोरेंची आ.गोटेंविरुद्ध तक्रार
बदनामीकारक व लज्जा वाटेल असे पत्रक छापून त्याचे वाटप केल्याप्रकरणी धुळे शहराचे आ. अनिल गोटे व त्यांचे हस्तक यांच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सौ. भारती मनोज मोरे यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 7 नोव्हेंबर रोजी आ.अनिल गोटे यांनी त्यांच्या लेटरपॅडवर बदनामीकारक व लज्जा वाटेल अशा आशयाचे पत्रक तयार करुन सदर पत्रक शहरात व सर्वोदय कॉलनी परिसरात वाटले. त्यात लज्जा उत्पन्न होईल, अशा आशयाचा मजकुर होता.

तसेच त्यामुळे माझ्या पतीची बदनामी झाली आहे, असे सौ. मोरे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी सौ. मोरे या राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष व नगरसेवक मनोज मोरे यांच्या पत्नी असून शहर पोलिस ठाण्यात त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भादंवि 293, 500, 509, 34 प्रमाणे शहराचे आ.अनिल गोटे व त्यांचे हस्तक यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*