‘विकास पागल हुआ’ घोषणेने भाजपाचे धाबे दणाणले – आ.कुणाल पाटील

0

सोनगीर । वार्ताहर-सोनगीरच्या विकासासाठी मागाल ते मिळेल असे आश्वासन देतांनाच धार्मिक भावना भडकावून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारचा खरा अजेंडा जनतेचा लक्षात आला असून विकासाचा फुगा फुटला आहे.

गुजरातेत सत्ता बदल होत आहे. राहूल गांधीच्या ‘विकास पागल हूआ’ या घोषणेने भाजप नेतृत्वाचे धाबे दणाणले आहे. अशी टीका आमदार कुणाल पाटील यांनी येथे केली. हिंदू मुस्लिमांनी एकत्रित काम करुन गावाचा विकास साधावा असे आवाहन माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी केले.

येथील मुस्लीम बहुउद्देशीय सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन व उद्घाटन आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते झाले. माजी आ.रोहिदास पाटील अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी ते बोलत होते. खा.हूसेन दलवाई यांनी त्यांच्या विकासनिधीतून सभागृहासाठी दहा लाख रुपये दिले असून आणखी तीस लाख रुपये आवश्यक आहे. सभागृहासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन माजी मंत्री पाटील यांनी दिले.

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती मधूकर गर्दे, जिल्हा परिषद सदस्य किरण अहिरराव, पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन,उपसरपंच धनंजय कासार, माजी सरपंच केदारेश्वर मोरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, प्रकाश गुजर, प्रमोद धनगर, डॉ.के.वाय.परदेशी, डॉ.कल्पक देशमुख, रवींद्र माळी, हेमंत चव्हाण, पराग देशमुख, चंद्रशेखर परदेशी, मनिलाल पाटील धुळे तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक नंदू धनगर, चंदन जैन, रमणीक जैन, बापू पाटील आदी उपस्थित होते.

माजीमंत्री रोहिदास पाटील म्हणाले की, सुलवाडे जामफळ योजना, मुंबई-दिल्ली कॅरिडॉर ही काँग्रेसची देणगी असून केंद्रात सरकार बदलले म्हणून ही कामे सुरू झाली नाहीत. नोटाबंदीमुळे अनेक कंपन्या बंद पडून लाखो बेरोजगार झाले.

जीएसटीने व्यापार्‍यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे जनता भाजपाला कंटाळली आहे. पुढे सर्व ठिकाणी काँग्रेसची सत्ता येईल. अक्कलपाडा धरणासाठी तीस वर्षे पाठपुरावा केला आणि आता दुसरेच जलपूजन करीत आहेत.

पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदी, जीएसटीवर त्यांच्याच पक्षाचे माजी अर्थमंत्री टीका करीत आहेत. मनमानी कारभार सुरू आहे. जनतेने नेहमी काँग्रेसच्या पाठिशी राहावे.

जाती धर्मात तेढ निर्माण करणार्‍यांना त्यांची जागा दाखवून त्यांना बाजूला सारावे असे आवाहन त्यांनी केले. माजी पंचायत समिती सदस्य अविनाश महाजन समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे माजी सरपंच केदारेश्वर मोरे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद धनगर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास समाजबांधव व तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुत्रसंचलन प्रास्ताविक वआभार आरिमखाँ पठाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुस्लिम सोशल ग्रुपचे. आरिफ एस.पठाण, आरिफपठाण, मुन्ना शेख शमियोद्दीन पठाण, अश्रफ खाँ पठाण. हाजी सरदार कुरेशी, अनीस कुरेशी, हाजी इकबाल कुरेशी, जमील शेख करीम कुरेशी यांच्यासह मुस्लीम समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*