बिलाडी गावाला हागणदारी मुक्त करण्याचा निसर्ग समितीचा संकल्प

0

धुळे । दि.11 । प्रतिनिधी-महाराष्ट्र शासन व छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र समितीच्यावतीने तालुक्यातील बिलाडी गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी दत्तक घेण्यात आले आहे.याबाबत नुकतेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.गंगाथरन यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी निसर्गमित्र समितीचे जिल्हाध्यक्ष तथा उपशिक्षणाधिकारी डी.बी. पाटील समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, प्रदेश सचिव संतोष पाटील, भोकरचे सरपंच मंगलदास पाटील, बिलाडीचे ग्रामसेवक रविंद्र पाकळे, शहराध्यक्ष प्रा.एच.ए.पाटील, प्रा.पंकज शिंदे, राजेंद्र माळी, महिला शहराध्यक्षा सौ.सुनंदा गांगुर्डे, राजेंद्र गांगुर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता अभियानाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तडवी यांच्याशी चर्चा करण्यात आली.

यावर्षअखेर हगणदारी मुक्त गाव करण्यासाठी निसर्गमित्र समितीचे पदाधिकारींसह बिलाडी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरीक, कार्यकर्ते, महिला बचत गट, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प.शाळा, माध्यमिक हायस्कुलचे शिक्षक, शेतकरी, ग्रामस्थांनी या हगणदारी मुक्त गाव अभियानात सहभागी करून एक आदर्श गाव बनविण्याचा संकल्प असून ग्रामस्थांनी या राष्ट्रीय अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन निसर्ग मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष डी.बी. पाटील, संस्थापक प्रमुख प्रेमकुमार अहिरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*