आठ मंत्र्यांच्या उपस्थितीत धुळ्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या बैठकीस थोडयाच वेळात होणार सुरवात

0
धुळे | दि.१० | प्रतिनिधी :  तब्बल आठ मंत्र्यांच्या उपस्थितीत धुळ्यात आज जलयुक्त शिवार अभियानाबाबतच्या बैठकीस थोड्या वेळात सुरवात होत आहे.

जलयुक्त शिवार अभियानाची नाशिक विभागीय आढावा बैठक धुळे येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात दि.११ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी १० वाजता राज्याचे मृद व जलसंधारण व राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

दुपारी ४ वाजता विभागस्तरावरील राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार वितरण सोहळा होईल. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी यांनी  राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यगृह परिसराची पाहणी केली.

नाशिक विभागीय आढावा बैठक व पुरस्कार वितरण सोहळ्यास मृद व जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे यांच्यासह जळगावचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन, नंदुरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिक विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांच्यासह विविध यंत्रणांचे विभागीय प्रमुख, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित असतील.

LEAVE A REPLY

*