महानगरपालिका हद्दीतील शेतकर्‍यांच्या शेतीपंपासाठी 24 तास वीजपुरवठा करा !

0

धुळे । दि.10 । प्रतिनिधी-महानगरपालिका हद्दीतील शेतकर्‍यांच्या शेतीपंपासाठी 24 तास विजपुरवठा व्हावा, या मागणीचे निवेदन मनपा हद्दीतील शेतकर्‍यांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

याबाबत दिलेल्या निवेदनात शेतकर्‍यांनी म्हटले आहे की, पूर्वी विद्युत वितरण कंपनीतर्फे 24 तास विजपुरवठा होत होता. परंतु गेल्या एक ते दीड वर्षापासून शेतकर्‍यांना एका आठवड्यात दिवसा आठ व रात्री आठ तास विजपुरवठा होत आहे.

सध्या विजपुरवठा कमी होत असल्याने शेतीला पाणी देणे शक्य होत नाही. तसेच शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय, कुक्कुट पालन इत्यादी जोडव्यवसाय देखील करतात, परंतु विजपुरवठा कमी होत असल्याने हा व्यवसाय देखील डबघाईस आला आहे.

एखाद्या शेतकर्‍याच्या शेतीपंपाचा रात्रीच्या वेळी विजपुरवठा खंडीत झाला तर तक्रार केल्यावर विज वितरण कंपनी वायरमन पाठवला जात नाही.

या भागासाठी वायरमनची कायमस्वरुपी नेमणूक करण्यात यावी तसेच शेती पंपाचे बिलांची वाटप होत नाही. त्यामुळे शेती पंपाचे विजबील नियमीत शेतकर्‍यांना मिळाले पाहिजे.

तसेच विज वितरण कंपनीकडून विजपुरवठा कमी होत असल्याने अनेक अडचणी निर्माण होत असून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

तरी शेतकर्‍यांना 24 तास विजपुरवठा करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे, निवेदनावर विरोधी पक्षनेता गंगाधर माळी, शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

LEAVE A REPLY

*