नाट्यकर्मी संदीप पाचंगे यांचा गौरव

0

धुळे । दि.9 । प्रतिनिधी-धुळ्यातील एमएसईबी कामगार नाट्यकर्मी संदीप पाचंगे यांचा महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ जळगाव गट कार्यालयातर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

खान्देशातील एकूण चार कामगार जे व्यवसायाने कामगार असूनही नोकरी सांभाळून नाट्यक्षेत्रात नाट्यचळवळ प्रगल्भ करण्यासाठी कार्यरत आहेत.

खान्देशात काम करणार्‍या योगेश शुक्ल, शरद भालेराव , श्री.दशपुत्रेे व संदीप पाचंगे अशा एकूण चार कामगारांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी मुंबई नाट्यपरिषदेचे संचालक श्रीपाद जोशी, शाहीर परिषदेचे राज्याध्यक्ष विनोद ढगे तसेच जळगाव कामगार कल्याण अधिकारी श्री.खेडकर, भानुदास जोशी, मिलिंद पाटील व जळगाव येथील नाट्यकर्मी उपस्थित होते. या कार्यक्रमास नाट्य क्षेत्रातील विविध कलावंत व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*