प्रा.अनिल सोनार यांना संगीत नाट्यलेखन पुरस्कार

0
धुळे |  प्रतिनिधी :  २०१६-१७ या वर्षातील नवीन नाट्यसंहितांसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ९७ व्या नाट्य संमेलनाचा विशेष उपक्रम म्हणून घेण्यात आलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत संगीत नाट्य लेखनासाठी असलेला विशेष पुरस्कार प्रा.अनिल सोनार यांच्या ‘गाऊ कोणते गीत’ या नाट्यसंहितेस जाहीर करण्यात आला आहे.

पारितोषिक वितरण सोहळा दि.१४ नोव्हेंबर रोजी नाट्य परिषदेच्या मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.

‘गाऊ कोणते गीत’ हे नाटक मुंबईच्य रंगशारदा या नाट्यसंस्थेतर्फे नामवंत गायक अभिनेत्यांच्या संचात लवकरच नाट्य रसिकांच्या भेटीस येत आहे. पाश्‍चात्य आणि पौर्वात्य संगीतातला संघर्ष व समन्वय दाखवणार्‍या या नाटकाला तीन संगीतकार संगीत देत असून भारतीय अभिजात संगीताची बाजू ज्ञानेश पेंढारकर, तर दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक, अभिनेते विजय गोखले हे सांभाळत आहेत.

संगीत सम्राट या गानस्पर्धेत गाजलेल्या ‘दंगलगर्ल्स’ ग्रुपच्या तीन गायिका तरुणी या प्रथमच प्रमुख गायिका अभिनेत्रींच्या भूमिकेत चमकणार आहेत. प्रमुख भूमिकेत बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कारने सन्मानीत झालेल्या अस्मिता चिंचाळकर या गानसरस्वतीची भूमिका साकार करत आहेत.

नाटककार कै.विद्याधर गोखले यांनी स्थापन केलेली रंगशारदा ही संस्था त्यांच्या मृत्यूनंतर प्रथच ‘गावू कोणते गीत’ या नाटकाच्या निमित्ताने, नव्याने संगीतनाट्य निर्मितीत उत्साहाने उतरली आहे.

LEAVE A REPLY

*