मंडळाधिकारी, तलाठींना डांबणार्‍यांवर कारवाई करा !

0

कापडणे । दि.9 । वार्ताहर-शिंदखेडा तालुक्यातील मुडावद सरपंचासह माजी पं.स.उपसभापतींनी कायदा हातात घेऊन मंडळाधिकारींसह तलाठींना जबरदस्तीने बेकायदेशिररित्या डांबुन ठेवले.

या घटनेचा निषेध करीत दोषींवर कायदेशिर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा तलाठी संघातर्फे आज (दि.9) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

तसेच यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.दोषींवर कार्यवाही न झाल्यास जिल्हाभर लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान शिंदखेडा तहसिलदारांनी नरडाणा पोलीस ठाण्यास पत्र पाठवुन यासंदर्भात खुलासा मागविला आहे.

मुडावद येथे मंडळाधिकारी व तलाठी यांना काही ग्रामस्थांनी जबरदस्तीने डांबुन ठेवल्याप्रकरणी तलाठी संघातर्फे या घटनेचा निषेध करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (दि.9) निदर्शने करण्यात आली. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी संघाने केली.

जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात तलाठी संघाने म्हटले आहे की, मुडावद येथील पं.स.सदस्य ललित वारूडे व मुडावद सरपंच प्रदीप महाजन यांच्या चिथावणीवरून मुडावद येथील काही ग्रामस्थांनी कायदा हातात घेवून विविध कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयात दि.8 नोव्हेंबर रोजी मंडळ अधिकारी संदेश नेरकर व तलाठी पृथ्वीराज गिरासे यांना तब्बल 4 ते 5 तास बेकायदेशीररित्या डांबुन ठेवले.

सदरची घटना ही अत्यंत निंदनीय असून या घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. तसेच गौण खनिज संदर्भात दंडात्मक कारवाई करतांना पोलीस संरक्षणाची मागणी केलेली आहे.

असे असतांना तलाठी व मंडळाधिकारी यांना विनासंरक्षण कारवाई करावी लागते. त्यावेळी त्यांच्यावर जीवघेणा हल्ले होतात.तरीही महसुल विभागाचे पथक दंडात्मक कारवाई करतात.

परंतू एका तलाठी व मंडळ अधिकार्‍याला डांबून ठेवल्याचा प्रकार झाला असून संबंधीतांवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष एन.वाय.कुळकर्णी, सरचिटणीस वाय.आर.पाटील, ए.ए.भामरे, जी.डी.महाले, सी.यू.पाटील, एस.बी.मोहिते, महेंद्र पाटील, मनोहर बी. पाटील, एस.एस.पाटील, राकेश साळुखे, पी.के.धनगर, श्री.ढोले, श्री.कोकणी, दीपक बाविस्कर, एस.डी.बाविस्कर, श्री.म्हसळकर, एम.एम.शास्त्री, श्री.पातुरकर, एस.जी.सूर्यवंशी, आर.बी.राजपूत, डी.एस.गीते, सी.डी.पाटील, मनोज गोसावी, संजय गोसावी, एस.पी.मराठे, श्री.चन्द्रात्रे, श्री.दाभाडे, श्री.अहिरराव, श्री.लोंढे, व्ही.एन.गोरे, श्री. खान, श्री.काकड़े, बी.एस.चौधरी, डी.एस.ईशी, आर.डी.पवार, श्री.वाघ, श्री.गिरासे, वि.एस.सोनवणे, जी. एस.सोनवणे, श्री.बोरसे, श्री.नादरगे, कोकणी, मांजलकर आदींसह मनीषा ठाकरे, ममता ठाकरे, धनगर, स्नेहल वळवी, अनिता झाल्टे, अर्चना पौल, पवार, पाटील, बाविस्कर, सोनल थोरात, रीना खिल्लारे, पुष्पा वाणी, पी.ए.राजपूत आदी पदाधिकार्‍यांनी केली आहे. दोषींवर कार्यवाही न झाल्यास जिल्हाभर लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी तलाठी संघाच्या वतीने देण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*