गौण खनिज चोरी; जीएचव्हीच्या डंपर चालकावर गुन्हा

0

धुळे । दि.9 । प्रतिनिधी-नागपूर-सुरत महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी जीएचव्ही कंपनीने गौण खनिजाची चोरी केल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात डंपर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन लाख चार हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जीएचव्ही कंपनीकडून नागपूर-सुरत महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या कामासाठी मोराणे शिवारात दि.3 नोव्हेंबर रोजी एमइच 18 बीजे 0109 क्रमांकाच्या डंपरमधून विना परमीटशिवाय गौण खनिज मुरुमची वाहतूक करतांना डंपर चालक आढळून आला.

या ठिकाणाहून तीन लाखांचा डंपर आणि चार हजार रुपये किंमतीचे गौण खनिज असा तीन लाख चार हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्याबाबत तलाठी विजय हिरामण बाविस्कर यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन भादंवि 379, महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे 48 (7) (8) प्रमाणे डंपर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक के.एम.दामोदर हे करीत आहेत.

खंडणी मागितल्याचा वाद – पेटले, ता.साक्री शिवारात शेतातील पवन चक्कीजवळ इशाक जॉन गामीत व अन्वरभाई यांना ठार मारण्याची धमकी देवून दहा जणांनी दमदाटी केली व मारहाण करुन औषधी पांढरा कांदा उपयोगी औषध म्हणून पवार याने न देता तुम्हास छडवेल येथे यावे लागेल, असे सांगून फसवणूक केली. त्यानंतर इशाकला 4 नोव्हेंबर रोजी पुन्हा फोन करुन मोबाईल पाहिजे असल्यास टिटाणे फाटा येथे 15 हजार रुपये व मोबाईल घेवून यावे, यासाठी खंडणी मागितली. या मारहाणीत इशाक व अन्वरभाई हे दोघे जण जखमी झाले आहेत, अशी फिर्याद निजामपूर पोलिस ठाण्यात इशाक जॉन गामीत यांनी दिली. भादंवि 395, 384, 420, 504, 506, 34 प्रमाणे पवार, रा.पेटले, पांडे आणि आठ जण यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

मोटारसायकल चोरी – दरखेडा, ता.शिंदखेडा येथे राहणारे ज्ञानेश्वर भिमराव पवार यांनी त्यांच्या मालकीची 20 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल (क्र.एमएच 18 एआर 1098) ही दि.8 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता दरवाडे शिवारातील शेतासमोरील चिमठाणे-शिंदखेडा रोडवर लावलेली होती. शेतातील काम आटोपून दुपारी 12 वाजता घरी जेवणासाठी निघाले असता मोटारसायकल मिळून आली नाही. याबाबत ज्ञानेश्वर पवार यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

*