राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे सिलिंडरची अंत्ययात्रा

0

धुळे । दि.8 । प्रतिनिधी-घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान केंद्र शासन बंद करण्याची तयारी सुरु आहे. तरी सिलिंडरच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलन केले. या आंदोलनांतर्गत गॅस सिलिंडर स्वर्गरथावर ठेवण्यात येवून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, मिनल पाटील, प्रियंका पाटील, सुमित्रा चौधरी, मालती पाटील, राधिका ठाकूर, वंदना देवरे, कल्पना गवळी, इंदुबाई वाघ, सारिका मराठे आदींसह कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करुन जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

*