तासिका नियोजन परिपत्रकाविरोधात कलाशिक्षकांचे धरणे

0
धुळे / तासिका नियोजनाचे परिपत्रक शासनाने त्वरीत मागे घ्यावे, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
पहिली ते चौथी या प्राथमिक शाळांमध्ये कला व कार्यानुभवाच्या प्रत्येकी चार तासिका होत्या व माध्यमिक विद्यालयांमध्ये कलेच्या व कार्यानुभवाच्या तसेच क्रीडाच्या तासिका इ. पाचवी ते आठवीसाठी पुर्वी प्रत्येक तुकडीस चार तासिका ठरवून दिलेल्या आहेत, असा शासन निर्णय असतांना शिक्षण आयुक्तांनी कलाशिक्षकांच्या तासिकेत पन्नास टक्के कपात केली आहे.

याबाबत कलाशिक्षक संघाच्यावतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण संचालक उपसंचालक, आ. डॉ. सुधीर तांबे आदींना निवेदन देण्यात आले आहे.मात्र तासिका कपातीचे परिपत्रक मागे घेण्याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे जिल्ह्यातील कलाशिक्षकांचे धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी प्रल्हाद साळुंके, सुनिल महाले, राजेंद्र ठाकूर, अजय भदाणे, गणेश फुलपगारे, अरुण देवरे, रावसाहेब बैसाणे, मंगेश घुगे, प्रदीप एस.पाटील, संजय वानखेडे आदी उपस्थित होते.

शारीरिक शिक्षण समितीतर्फे आंदोलन – शासन निर्णय असतांना शिक्षण आयुक्तांनी कोणताही नियम न पाळता कलाशिक्षकांच्या तासिकेत पन्नास टक्के कपात केल्याचा निषेध करत महाराष्ट्र राज्य कला व शारीरिक शिक्षण समितीतर्फे आंदोलन करण्यात आले.

LEAVE A REPLY

*