लोकअदालतमध्ये 6,752 तक्रारींचा निपटारा

0

धुळे । दि.8 । प्रतिनिधी-राष्ट्रीय लोकअदालतमध्ये सहा हजार 752 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. तर 75 कायदेविषयक शिबिरे घेण्यात येवून त्यात 16 हजार 11 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला.

राष्ट्रीय लोकअदालत फेब्रुवारी, एप्रिल, जुलै आणि सप्टेबर महिन्यात घेण्यात आली. त्यात फेब्रुवारीमध्ये 11 हजार 661 तक्रारी आल्या. त्यापैकी 2534 तक्रारी निकाली काढण्यात आल्या.

एप्रिल महिन्यात दोन हजार 343 तक्रारी आल्या. त्यात 692 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या अदालतमध्ये चार हजार 212 तक्रारी आल्या. त्यापैकी एक हजार 553 तक्रारींचा निपटारा झाला. तर सप्टेबरमध्ये पाच हजार 550 तक्रारी आल्या. त्यापैकी एक हजार 973 तक्रारींचा निपटारा झाला आहे.

चारवेळा घेण्यात आलेल्या अदालतमध्ये 23 हजार 766 तक्रारी आल्या. त्यापैकी सहा हजार 752 तक्रारींचा निपटारा करण्यात आला.

कायदेविषयक शिबिरे 75 वेळा घेण्यात आले. त्यात 16 हजार 11 जण लाभार्थी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*