नावरा येथे शेतकर्‍यावर चाकूहल्ला

0

धुळे । दि.8 । प्रतिनिधी-मागील भांडणाच्या वादातून 32 वर्षीय शेतकर्‍याला चाकूने भोसकून जखमी केल्याप्रकरणी 14 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नावरा, ता.धुळे येथे घडली. या हाणामारीत दोन जण जखमी झाले आहेत.

याबाबत माहिती अशी की, मागील भांडणावरुन पंकज छोटीराम चव्हाण (वय 32, रा.नावरा) यांच्याशी विश्वास नामदेव सूर्यवंशीसह 14 जणांनी दि.6 नोव्हेंबर रोजी वाद झाला.

या वादातून चौकात काठ्या व दांडके घेवून 14 जण आले व त्यांनी पंकज छोटीराम चव्हाण आणि सुनील रमेश कोतेकर यांना शिवीगाळ करुन काठ्यांनी मारहाण केली. तर विश्वास नामदेव सूर्यवंशी याने चाकूने पंकजच्या पोटावर भोसकून जखमी केले.

तसेच पंकज व सुनीलला मारहाण करुन जखमी केले. याबाबत पंकज छोटीराम चव्हाण यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

भादंवि 307, 323, 143, 147, 148, 149 प्रमाणे विश्वास नामदेव सूर्यवंशी, अशोक सखाराम सूर्यवंशी, आत्माराम जगन्नाथ सूर्यवंशी, आसाराम जगन्नाथ सूर्यवंशी, चंद्रकांत माधवराव पाटील, नीलेश अशोक सूर्यवंशी, अमोल चंद्रकांत पाटील, प्रविण लोटन पाटील, योगेश लोटन पाटील, पांडुरंग देविदास पाटील, रामराव दौलत पाटील, सागर विश्वास सूर्यवंशी, जगन्नाथ खंडू सूर्यवंशी, महेश रामराव सूर्यवंशी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलेला दमदाटी – नावरा, धुळे येथे राहणार्‍या जिजाबाई नामदेव पाटील (वय 59) यांच्या घराजवळ दि.6 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वाजता संतोष लोटन पाटीलसह 15 जणांनी गर्दी करुन जिजाबाईचा भाऊ विश्वास नामदेव पाटील याला घराबाहेर काढा, त्याला ठार मारण्याची धमकी देवून जिजाबाईच्या घरावर दगड, विटा फेकल्या. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात जिजाबाई नामदेव पाटील यांनी फिर्याद दिली. भादंवि 143, 147, 149, 337, 504, 506 प्रमाणे संतोष लोटन पाटील, नारायण राजाराम पाटील, सुनील रमेश मराठे, सागर लोटन मराठे, छोटू नथ्थू मराठे, शिवाजी रामदास पाटील, धनराज महारु पाटील, भटू नथ्थू पाटील, गुलाब शंकर पाटील, समाधान गुलाब पाटील, चंद्रकांत त्र्यंबक पाटील, भूषण माणिक पाटील, किशोर बन्सीलाल पाटील, दगडू शंकर पाटील आणि पंकज छोटूराम चव्हाण यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

दुकानात चोरी – नरडाणा, ता.शिंदखेडा येथील रामदास रावजी पाटील यांच्या होलसेल किराणा दुकानासमोर गोपीचंद काशिराम पाटील, रा.पाष्टे यांच्या पिशवीतील 30 हजार रुपये रोख व प्लॉटची कागदपत्रे अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. याबाबत गोपीचंद काशिराम पाटील यांनी नरडाणा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

बोकडाची चोरी – म्हसदी, ता.साक्री येथे राहणारे सदाशिव यशवंतराव देवरे यांच्या मालकीचे 13 हजार रुपये किंमतीचे बोकड व बकरी अनिल गणेश मोरे व तीन जणांनी चोरुन नेले. याबाबत सदाशिव देवरे यांनी साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

कापडणे येथे हाणामारी- कापडणे, ता.धुळे येथे राहणारे भटू विश्राम पाटील बदनामी करतात या कारणावरुन नवल नामदेव पाटीलसह आठ जणांनी भटू पाटील यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. याबाबत भटू पाटील यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 143, 323, 504, 506, 427 प्रमाणे नवल पाटीलसह आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तर याप्रकरणी भटू गोरख पाटील यांनी परस्पर तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरुन भटू विश्राम पाटीलसह सहा जणांवर भादंवि 143, 147, 323, 504, 506, 427, 385 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*