लामकानीत डोंगराला आग

0

लामकानी । वार्ताहर-तालुक्यातील लामकानी येथील इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये आज अचानक आग लागल्याने शाळेच्या विध्यार्थ्यानी जीव धोक्यात घालून ही विझवली यात हजारो टन चारा जळून खाक झाला आहे.

लामकानी-चिंचवार रस्त्यावरील गोवर्धन डोंगराच्या बारीत आज दि.6 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.

या घटनेची माहीती माजी सरपंच नानाभाऊ पाटील यांनी शाळेतील शिक्षकांना दिल्याने शिक्षक व दहावीच्या विद्यार्थी घटनास्थळी दाखल झाले होते.

यावेळी त्यांनी गोवर्धन डोंगराला लागलेली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर वनमजुरांसह आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

आग कशामुळे लागली याचे नेमके कारण मात्र अद्याप कळू शकले नाही.यावेळी माजी सरपंच नानाभाऊ पाटील, इंग्लिश स्कूलचे शिक्षक डी.व्ही. राऊळ, ए. एच. माळी, शिपाई शांताराम माळी यांनी परिश्रम घेतले विद्यार्थ्यांचे पर्यावरणतज्ञ डॉ धनंजय नेवाडकर, वनधिकारी, ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

*