धुळे जिल्हयात ८८ हजार शेतीपंपाची ५८४ कोटींची थकबाकी

0
धुळे |  प्रतिनिधी :  जिल्ह्यात दोंडाईचा विभागाची सर्वाधिक थकबाकी असून जिल्ह्यातील ८७ हजार ९४६ शेतीपंप ग्राहकांकडे ५८४ कोटीची थकबाकी आहे. त्यात ३२१ कोटी मुळ थकबाकी व २६३ कोटी व्याज व दंडाची रक्कम आहे.

जिल्ह्यात दोंडाईचा विभागातील २८ हजार ५७५ ग्राहकांकडे सर्वाधिक २८४ कोटीची थकबाकी आहे. त्यात १५६ कोटी मुळ थकबाकी तर १२८ कोटी व्याज व दंडाची रक्कम आहे. धुळे ग्रामिण विभागात ४२ हजार ९५६ ग्राहकांकडे २१७ कोटी (मुळ थकबाकी ११६ कोटी व व्याज व दंड १०१ कोटी) आहे. धुळे शहर विभागात १६ हजार ४१५ ग्राहकांकडे ८३ कोटी (मुळ थकबाकी ४८ कोटी व व्याज व दंड ३५ कोटी) आहे.

शिरपूर उपविभागांची थकबाकी सर्वाधिक २०० कोटी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा विभागातील शिरपूर उपविभागांकडे १४ हजार ९४९ शेतीपंप ग्राहकांकडे सर्वाधिक २०० कोटीची थकबाकी आहे. त्यात मुळ थकबाकी १११ कोटी तर व्याज व दंड ८९ कोटी आहे. शिंदखेडा उपविभागात ६ हजार ९१५ ग्राहकांकडे ४२ कोटी (मुळ थकबाकी २५ कोटी व व्याज व दंड १७ कोटी) आहे.

दोंडाईचा उपविभागात ६ हजार ७११ ग्राहकांकडे ४१ कोटी (मुळ थकबाकी २१ कोटी व व्याज व दंड २० कोटी) आहे. साक्री उपविभागामध्ये १४ हजार १०७ ग्राहकांकडे ८१ कोटी (मुळ थकबाकी ४५ कोटी व व्याज व दंड ३६ कोटी) आहे. धुळे ग्रामिण उपविभागांकडे १७ हजार ग्राहकांकडे ८१ कोटी (मुळ थकबाकी ४० कोटी व व्याज व दंड ४१ कोटी) आहे.

पिंपळनेर उपविभागात ११ हजार ८४२ ग्राहकांकडे ५४ कोटी (मुळ थकबाकी ३१ कोटी व व्याज व दंड २३ कोटी) आहे. धुळे रचना उपविभागात १० हजार ७८७ ग्राहकांकडे ६३ कोटी   (मुळ थकबाकी ३५ कोटी व व्याज व दंड २८ कोटी) आहे. नरडाणा उपविभागात ५ हजार ५३० ग्राहकांकडे १९ कोटी (मुळ थकबाकी १२ कोटी व व्याज व दंड ७ कोटी) आहे.

धुळे जिल्ह्यात ३० हजार रूपयापेक्षा कमी थकबाकी असलेले शेतीपंप ग्राहकसंख्या व थकबाकी- धुळे जिल्ह्यात ३० हजार रूपयापेक्षा कमी थकबाकी असलेले शेतीपंप ग्राहकसंख्या ४७ हजार ६०७ असून त्यांच्याकडे ८९ कोटीची थकबाकी आहे.

त्यात मुळ थकबाकी ६४ कोटी तर व्याज व दंड २५ कोटी आहे. जिल्ह्यात ३० हजार रूपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले शेतीपंप ग्राहकसंख्या व थकबाकी- धुळे जिल्ह्यात ३० हजार रूपयापेक्षा अधिक थकबाकी असलेले शेतीपंप ग्राहकसंख्या ४० हजार ३३९ आहे. त्यांच्याकडे ४९५ कोटीची थकबाकी आहे. त्यात मुळ थकबाकी २५६ कोटी तर व्याज व दंड २३९ कोटी आहे.

१४ हजार २०० शेतीपंप ग्राहकांनी वीज जोडणी घेतल्यापासून एकदाही वीजबिल भरले नाही. जिल्ह्यातील १४ हजार २०० शेतीपंप ग्राहकांनी वीज जोडणी घेतल्यापासून एकदाही वीजबिल भरले नाही. या ग्राहकांकडे ७५ कोटी रूपये थकबाकी आहे.

दोंडाईचा विभागातील सर्वाधिक ५ हजार २३९ ग्राहक असून त्यांच्याकडे ३५ कोटी थकबाकी आहे त्यापाठोपाठ धुळे ग्रामिण विभागातील ७ हजार ग्राहकांकडे ३२ कोटी ६७ लाख थकबाकी आहे.

 

LEAVE A REPLY

*