नगरपंचायत बरखास्तीची याचिका खंडपीठाने फेटाळली

0

साक्री । दि.2 । ता.प्र.-नगरपंचायत बरखास्त करण्यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून आज दि.2 रोजी फेटाळून लावण्यात आली.

न्यायालयाच्या निर्णयानंतर नगरपंचायत सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्याकडून फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात साक्री नगरपंचायत विरोधात सुमित नामदेवराव पाटील यांनी याचिका दाखल केली होती. यावर साक्री नगर पंचायतकडून आपली बाजू मांडण्यात आली त्यात असे स्पष्ट करण्यात आले की, नगरपंचायतीची अधिसूचना जून 2015 मध्ये जाहीर झाली होती आणि सहा महिन्यानंतर निवडणूक होऊन नोव्हेंबर 2015 मध्ये नवनिर्वाचित नगरसेवक सत्तेत आले.

याचिकाकर्ता सुमित पाटील यांचे वार्ड क्र. 2 मध्ये मतदार यादीत नाव असून त्यांनी या निवडणुकीत मतदान केले.त्यावेळी किंवा त्या अगोदर त्यांनी आक्षेप घेतला नाही.तब्बल दीड वर्षानंतर सदरची याचिका दाखल केली.

नवनिर्वाचित नगरसेवकांना पार्टी केले नाही, अशी भूमिका मांडली. यावर उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाकडून सदर याचिका विलंबाने दाखल केल्यामुळे याचिका फेटाळून लावली. या याचिकेचे साक्री नगरपंचायतकडून अ‍ॅड. ज्ञानेश्वर बागुल यांनी कामकाज पाहिले.

न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर नगरपंचायतीचे गटनेते ज्ञानेश्वर नागरे यांनी माहिती दिली की, नगरपंचायत विरोधात याचिका कर्त्याच्या माध्यमातून याचिका दाखल करून विरोधकांनी शहराच्या विकासात अडथळा घालण्याचे कार्य केले आहे.

न्यायालयात दीड वर्ष एवढा वेळ वाया घालवण्यापेक्षा त्यांनी तो वेळ शहराच्या विकासाकरिता दिला असता तर शहराच्या विकासात भर पडली असती. फक्त विरोध करण्याचे काम विरोधकांकडून होत असून शहरच्या विकासाशी त्यांना काही घेणे देणे नाही.

 

LEAVE A REPLY

*