खोरदड येथे हाणामारी : 11 जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा

0

धुळे । दि.2 । प्रतिनिधी-खोरदड, ता.धुळे येथे किरकोळ कारणावरुन हाणामारी झाली. यात दोन जण जखमी झाले असून 11 जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, खोरदड, ता.धुळे येथे राहणारे सुनील प्रकाश पाटील हे खोपडीचे पूजन करुन फेरी मारत असताना विकास शाम पाटील याने फिर्यादीस फॅटने मारले तसेच विकाससह सहा जणांनी हाताबुक्क्यांनी मारहाण करुन रावण भिमराव पाटील याने सुनीलच्या बरगडीत फॅटने मारुन जखमी केले व अन्य जणांनी हाताबुक्क्यांनी मारुन जखमी केले.

पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर ठार मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद सुनील प्रकाश पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 143, 147, 149, 323, 504, 506 प्रमाणे विकास शाम पाटील, सागर शाम पाटील, शाम भिका पाटील, भिमराव भिका पाटील, रावण भिमराव पाटील, दिवाण भिमराव पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

तर शाम भिका पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात परस्पर तक्रार दिली असून त्यात म्हटले आहे की, विकास शाम पाटील हा खोपडीला फेरी मारत असताना सुनील प्रकाश पाटील याने त्याच्या पायात पाय अडकवून त्याला खाली पाडले.

यावरुन सुनीलसह पाच जणांनी गर्दी करुन विकासला हाताबुक्क्यांनी मारहाण करुन हा वाद सोडविण्यासाठी शाम हे गेले असता त्यांनाही हाताबुक्क्यांनी पाठ व पोटावर मारहाण केली.

तसेच शामची पत्नी भांडण सोडविण्यासाठी गेली असता त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून नुकसान झाले. त्यांच्या तक्रारीवरुन भादंवि 143, 147, 149, 427, 323, 504, 506 प्रमाणे सुनील प्रकाश पाटील, प्रकाश भगवान पाटील, अनिल प्रकाश पाटील, देविदास भगवान पाटील, राहूल देविदास पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

मोटारसायकल चोरी – तावखेडा, ता.शिंदखेडा येथे राहणारे राजेंद्र बळीराम पाटील यांनी त्यांच्या मालकीची 25 हजार रुपये किंमतीची एमएच 18 एएफ 1239 क्रमांकाची मोटारसायकल तावखेडा शिवारातील शेताच्या बांध्यावर लावलेली होती. अज्ञात चोरट्याने सदर मोटारसायकल चोरुन नेली, अशी फिर्याद राजेंद्र पाटील यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात दिली. त्यावरुन भादंवि 379 प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणी बेपत्ता – उंबरखेडा, ता.चाळीसगाव येथे राहणारी पूजा मधुकर चव्हाण (वय 19) ही दिवाळीनिमित्त शहरातील मोहाडी येथील शिवानंद कॉलनीत राहणारे तिचे मामा छोटू वाल्मिक कोळी यांच्याकडे आली होती, परंतु दि.30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता घरी कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली. याबाबत छोटू वाल्मिक कोळी यांनी माहिती दिली. त्यावरुन मिसिंग दाखल करण्यात आली आहे.

शिरपूर शहरातील करवंद रोडवरील स्टेट बँक कॉलनीत राहणारी सौ.पूनम विनोद पाटील (वय 27) ही घरात कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली. तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला, परंतु ती सापडली नाही. याबाबत विनोद मधुकर पाटील यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन मिसिंग दाखल करण्यात आली.

मंगळसूत्र चोरी – लोहगाव, ता.शिंदखेडा येथे राहणारी शुभांगी प्रमोद पाटील ही दि.31 ऑक्टोबर रोजी विखरण येथे द्वारकाधिश यात्रेला गेल्या असताना अज्ञात तीन महिलांनी त्यांच्या गळ्यातील 15 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र सहा ग्रॅम वजनाचे चोरुन नेले. याबाबत रवींद्र नारायण पाटील यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे अज्ञात महिलांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाहितेचा छळ – शहरातील देविदास कॉलनी येथे राहणारी हेमलता उर्फ राजश्री चेतन सोनवणे (वय 23) या विवाहितेने प्लॉट घेण्यासाठी पाच लाख रुपये माहेरुन आणले नाहीत म्हणून तिचा छळ करुन तिला हाताबुक्क्यांनी मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत हेमलता उर्फ राजश्री चेतन सोनवणे यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे चेतन शिवाजी सोनवणे, प्रमिला उर्फ शोभा शिवाजी पाटील, प्रविण शिवाजी सोनवणे, नम्रता प्रविण सोनवणे, मावस सासरे दिलीप वंजी पाटील, सुनीता दिलीप पाटील, मनोज भगवान पाटील, अनिता मनोज पाटील, भाईदास शांताराम पाटील, विजय शांताराम पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

जळाल्याने मृत्यू – जवखेडा, ता.शिरपूर येथे राहणार्‍या उज्ज्वला विकास पाटील (वय 45) या स्टोव्हवर चहा करत असताना अचानक भडका उडाला. त्यात त्या गंभीररित्या जळाल्या. त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार करतांना उज्ज्वलाबाईचा मृत्यू झाला. याबाबत विनोद निकम यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात माहिती दिली.

LEAVE A REPLY

*