गुड्ड्या हत्त्येप्रकरणी विशेष सरकारी वकीलपदी अ‍ॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती

0

धुळे । दि.1 । प्रतिनिधी-शहरात गाजलेल्या कुख्यात गुंड गुड्डया हत्येप्रकरणी शासनाच्या वतीने विशेष सरकारी वकीलपदी अ‍ॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधी व न्याय विभागातर्फे यासंदर्भात आज दि.1 नोव्हेंबर रोजी आदेश काढण्यात आले आहेत.

न्याय व विधी विभागाचे सेक्शन ऑफीसर आर.व्ही. चव्हाण यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या या आदेशात म्हटले आहे की, धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 150/2017 या गुन्ह्याच्या संदर्भात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे त्यांना आवश्यक त्या सोयी सवलती पुरविण्याबाबत यात उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान या संदर्भात घटनेचे तपास अधिकारी डी.वाय.एस.पी. निलेश सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता यासंदर्भातील कोणतेही पत्र अद्याप विभागाला प्राप्त झाले नसल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*