59 हजार शेतकर्‍यांना मिळणार लाभ – राजवर्धन कदमबांडे;धुळे-नंदुरबार जिल्हा बँक कर्जमाफीचे 100 टक्के फाईल अपलोड करणारी राज्यातील पहिली बँक!

0

धुळे । दि.31 । प्रतिनिधी-धुळे – नंदुरबार जिल्हा बँकेच्या संपूर्ण 107 फाईल परिपूर्ण 100 टक्के पुर्ण झाल्या असून संपूर्ण फाईल यशस्वीरित्या पूर्ण करणारी धुळे-नंदुरबार जिल्हा बँक ही महाराष्ट्रातील पहिली जिल्हा बँक ठरली आहे.

कामकाज करण्यासाठी धुळे व नंदुरबारचे जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले,. यामुळे धुळे-नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यातील 59 हजार 148 सभासद शेतकर्‍यांना कर्जमाफी होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. कदमबांडे म्हणाले की, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत संस्था, शेतकरी सभासदांना गेल्या तीन वर्षात जास्त कर्ज पुरवठा केला आहे.

परंतु 2012-13 ते 2015-16 या सलग चार वर्षात राज्य व जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीप, रब्बी हंगामात बहुसंख्य गावातील आणेवारी 50 पैशापेक्षा कमी होती.

जिल्ह्यात काही भागात अवेळी पाऊस गारपीट झाल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणान नुकसान झाल्यामुळे बरेच शेतकरी पीक कर्जाची, शेती कर्जाच्या मुदतीत परतफेड करु शकले नाहीत. परिणामी हे शेतकरी थकबारीदार राहिल्यामुळे असे शेतकरी बँकेकडून नव्याने पीक कर्ज घेण्यास पात्र होवू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अशा थकीत शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केले.

शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 जाहीर करण्यात आली. त्यात दि.1 एप्रिल 2009 ते 30 जून 2016 अखेर थकबाकीदारांना 1.50 लाखापर्यंत कर्जमाफी व 1.50 लाखावरील शेतकर्‍यांना एकवेळ समझोता योजना लागू केली.

तसेच 2015-16, 2016-17 वर्षात ज्या शेतकर्‍यांनी कर्जाची नियमित परतफेड केली अशा शेतकर्‍यांना 25 टक्के किंवा 25 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषीत केले.

सन 2009-10 ते 2015-2016 या कालावधीत कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकर्‍यांपैकी जे शेतकरी दि.30 जून 2016 रोजी थकबाकीदार असतील.

त्यांना वरील योजनेचा लाभ देण्याचे घोषित केले. शासनाचा सदर निर्णय जिल्हा बँकेला प्राप्त झाल्यानंतर व शासनाच्या वेळोवेळी होणार्‍या बदल व नवीन सूचना प्राप्त झाल्यानंतर शासनाने पुरविलेल्या कॉलम एक ते 66 नमुन्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शेतकरी सभासदांची धुळे व नंदुरबार या जिल्ह्याची माहिती विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे सचिव व बँकेचे तपासणीस, विभागीय अधिकारी यांच्याकडून युध्दपातळीवर अचूक माहिती मागवून बँकेने संगणक तज्ज्ञ एजन्सीला सदरचे कामकाज देवून बँकेच्या मुख्यालयात एका छताखाली तीन ते चार महिन्यापासून सतत 45 कर्मचार्‍यांकडून संगणकावर कामकाज करण्यात आले.

त्यात संगणकाद्वारे डाटा भरुन एक्सेल शिटमध्ये एसओपीनुसार दोन्ही जिल्ह्यातील एकूण 59 हजार 148 सभासदांची एकूण खातेसंख्या 87 हजार 363 बिनचूक माहिती भरुन 107 फाईल्स 100 टक्के अपडेट व केवायसी पूर्ततेसह शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर वेळीच अपलोड करण्यात आल्या होत्या.

परंतु शासनाच्या आयटी विभागाकडून सदर फाईलबाबत अपूर्णता येत असल्यामुळे सर्व फाईल परिपूर्ण होत नव्हत्या. म्हणून राज्य शासनाच्या आयटी टीमची मदत घेण्यात आली.

तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सचिव, बँकेचे तपासणीस, विशेष वसुली अधिकारी, विभागीय अधिकारी, मुख्य कार्यालयातील व्यवस्थापक, सरव्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सहकार्याने व जिल्हा उपनिबंधक, धुळे व नंदुरबार, जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग 1, सह.संस्था धुळे व नंदुरबार, विभागीय सहनिबंधक, सह.संस्था नाशिक, सहकार आयुक्त, पुणे व शासनाच्या आयटी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सदरचे कामकाज यशस्वीपणे बँकेने पूर्ण केलेले आहे. सदर कामकाजासाठी जिल्हा बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे व संचालक मंडळाचे मार्गदर्शन व सहकार्य केले आहे.

बँकेने अपलोड केलेल्या सर्व 107 फाईल्स सक्सेसफूल झालेल्या असून त्यानुसार शासनाकडून वेळोवेळी ग्रीन लिस्ट प्रसिध्द होईल. त्यानुसार शासन सर्व निधी, रकमा जिल्हा बँकेकडे वर्ग होतील.

सध्या पहिल्या टप्पयात 85 शेतकर्‍यांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आली आहेत. त्याप्रमाणे शेतकर्‍यांच्या खाती सदरची तात्काळ जमा करुन कर्जमाफी व प्रोत्साहनपर रक्कम वितरणाची नोंद घेण्यात येईल.

तसेच एक लाख 50 हजाराच्या वरील थकबाकीदार सभासदांनी उर्वरित कर्जाची रक्कम दिनांक 31 डिसेंबर 2017 च्या आत बँकेत भरणा करावी. जेणे करुन त्यांना एक लाख 50 हजाराच्या कर्जमाफीचा फायदा मिळेल, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी सांगीतले. यावेळी बँकेचे सिईओ धिरज चौधरी, सहाय्यक उपनिबंधक श्री. ठाकूर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*