शिंदखेडा नगराध्यक्षपदी मराठे उपनगराध्यक्ष देशमुख

0
शिंदखेडा / शिंदखेडा नगरपंचायत अध्यक्षपदी 75 वर्षीय मथुराबाई नामदेव मराठे यांची तर उपनगराध्यक्ष पदी उल्हास देशमुख यांची उर्वरित काळकरिता निवड करण्यात आली.
प्रांत यांच्या उपस्थितीत वरील निर्णय घोषित झाला. 75 वर्षीय नगराध्यक्षा भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष गोविंद उर्फ दादा मराठे यांच्या आजी होत.
मराठा समाजाला न्याय मिळाल्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त केल्या जात होत्या. मथुराबाई मराठे यांनी या अगोदर ग्रामपंचयत सदस्य म्हणूनही मान मिळवला होता समाजातही त्या लोकप्रिय आहेत.

आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा शेतकरी संवाद दौरा असल्याने ते आज तालुक्यातही आले होते.

त्यानिमित्त ज्याचे पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावळ यांच्या निवासस्थानी नूतन नगराध्यक्षा मथुराबाई मराठे यांचा रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रसंगी युवराज माळी किरण चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपनगर अध्यक्षपदी माजी बांधकाम सभापती उल्हास देशमुख यांची वर्णी लागली आहे. अत्यंत लहान वयात त्यांना हा बहुमान मिळाला आहे.

LEAVE A REPLY

*