बाबरे येथे बनावट दारुचा कारखाना उद्ध्वस्त

0
धुळे  / बाबरे, ता.धुळे येथे बनावट दारुचा कारखाना तालुका पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या ठिकाणाहून 69 हजार 110 रुपये किंमतीची बनावट दारु जप्त करण्यात आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, बाबरे, ता.धुळे येथे एका घरात बनावट दारु तयार केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांना मिळाली.
या माहितीच्या आधारे बाबरे येथे प्रविण उर्फ छोटू प्रकाश मराठे याच्या घरावर छापा टाकला असता तेथे दारु तयार केली जात होती.
पोलिसांनी या ठिकाणाहून मास्टर ब्लँड, टँगोपंच, रॉयल स्टॅग, डिप्लोमॅट, मॅगडावल व्हिस्की अशा विविध कंपनीचे 69 हजार 110 रुपये किंमतीचा बनावट दारुचा साठा जप्त करण्यात आला.

तसेच बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन, सेंट, रंग, रिकाम्या बाटल्या, बूच, लेबल, बाटल्या सिलबंद करण्याचे यंत्र, एमएच 41 एडी 2876 क्रमांकांची मोटारसायकल असा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला.

या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्रविण उर्फ छोटू प्रकाश मराठे याला अटक केली.

 

LEAVE A REPLY

*