शहीद मिलिंद खैरनार यांना साक्री, पिंपळनेरकरांची मानवंदना

0

पिंपळनेर । दि.12 । वार्ताहर-शहीद वीर जवान मिलिंद खैरनार यांना पिंपळनेर येथे पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

पिंपळनेर पोलिस ठाणे, पिंपळनेर तालुका पत्रकार संघटना, ग्रामपंचायत पिंपळनेर, कै.एन.एस.पी.पाटील विद्यालय, शिवसेनेतर्फे भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी वरुण राजालाही अश्रु अनावर झाले होते.

नंदुरबार तालुक्यातील बोराळे येथील वीर जवान मिलिंद खैरनार यांचे पार्थिव ओझर विमानतळावरुन, देवळा, सटाणा, पिंपळनेर मार्गे, साक्री, दुसाणे, मालपूर, दोंडाईचा, सारंगखेडा मार्गे बोराळे मुळगावी नेण्यात आले.

त्यादरम्यान दुपारी 2 वाजता पिंपळनेर शहरात शहीद मिलिंद खैरनार यांचे पार्थिव घेऊन वायुसेनेच्या गाड्या आल्या. यावेळी पिंपळनेर ग्रामपंचायतीसमोर स्टँड चौफुलीवर रस्त्याच्या दुतर्फा कै.एन.एस.पी.पाटील विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनींनी शहीद ‘वीर जवान मिलिंद खैरनार अमर रहे’च्या घोषणा दिल्या.

शहीद मिलिंद खैरनारांच्या पार्थिवावर पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय सुनिल भाबड, पीएसआय योगेश खटकळ, लोकेश पवार, ललीत पाटील, भूषण वाघ यांच्यासहसह पोलीस स्टॉपने पुष्पहार अर्पण केले.

त्यानंतर ग्रामपंचायत पिंपळनेरचे सरपंच सौ.हारजाबाई पवार, उपसरपंच राजेंद्र शिरसाठ, जि.प.सदस्य अ‍ॅड.ज्ञानेश्वर एखंडे, माजी उपसरपंच योगेश नेरकर, देवेंद्र कोठावदे, देविदास सोनवणे, ग्रामविकास अधिकारी डी.डी.चौरे, बाबा पेंढारकर यांनी पुष्पहार अर्पण केला.

कै.एन.एस.पाटील विद्यालयाचे प्राचार्य दिलीप जगताप व शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांनी पुष्पांजली वाहिली. पिंपळनेर पत्रकार संघटनेतर्फे अध्यक्ष सुभाष जगताप, विशाल गांगुर्डे, भरत बागुल, सद्दाम तसेच मुस्लीम समाजाध्यक्ष अलताफ सैय्यद, जहुर जहाँगीरदार, लियाकत सैय्यद यांच्यासह त्यांच्या सहकार्यानी पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. शिवसेनेतर्फे दत्तात्रय गुरव, पिंपळनेर शहराध्यक्ष उदय बिरारी, राकेश जैन, शिंद,े नानू पगारे यांनी पुष्पांजली अर्पण केली. नंतर पार्थीव साक्री मार्गे बोराळे रवाना झाले. यावेळी वरुण राजानेही हजेरी देऊन या लाडक्या जवानासाठी अश्रु ढाळून श्रध्दांजली अर्पण केली.

साक्री

वीरजवान मिलिंद खैरनार यांचे पार्थिव साक्री शहरात वायुदलाच्या एका वाहनाने साक्रीत दाखल झाले त्यावेळी ‘अमर रहे, अमर रहे, वीरजवान मिलिंदभाई अमर रहे! वंदे मातरम!’ असा जयघोष करीत पुुष्पांजली अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. जड अंतकरणाने वीर जवान मिलिंद खैरनार यांना मानवंदना देण्यात आली.

शहीद मिलिंद खैरनार यांचे पार्थिव आज दि. 12 रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास येथील पोलीस स्टेशन परिसरात पोहचले. याप्रसंगी आ.डी.एस.अहिरे, नगराध्यक्षा सौ. सोनल नागरे, उपनगराध्यक्ष अरविंद भोसले, माजी आ.जे. यु.ठाकरे, बाजार समिती सभापती पोपटराव सोनवणे, नगरपंचायत बांधकाम सभापती सुमित नागरे, तहसीलदार संदीप भोसले, पोनि आर. एस.पाटील, वीज अभियंता किशोर पाटील, अभियंता कपिल सानम, सतीश बेंद्रे, सोनलकुमार नागरे, विज वर्कर्स फेडरेशचे किरण नांद्रे, शरद धनगर, भारत कुवर, सोनल बोरसे, गिरीश देसले, लक्ष्मण देवरे, प्राचार्य एम.एम.सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र मराठे, शिवसेनेचे पंकज मराठे, प.स.गटनेते उत्पल नांद्रे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप नांद्रे, भाजप तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, शहराध्यक्ष महेंद्र देसले, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष डॉ देवेंद्र देवरे, वकील संघाचे अँड उत्तमराव मराठे, अँड शरद भामरे, नगरसेविका अँड पूनम काकुस्ते, स्वाती बेडसे, जि.प.सदस्य विजय ठाकरे आदीं उपस्थित होते.

मुस्लीम बांधवांनीही मोठ्या संख्येने उपस्थित देत मानवंदना दिली. त्यात आरिम शेख , रहीम शेख, हाजी कासम, अंजुम मिर्जा आदी होते. शालेय विद्यार्थ्यांनी महामार्गाच्या दुतर्फा थांबून आपल्या लाडक्या वीरजवानाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हातात डिजिटल फलक धरून मानवंदना दिली.

साक्री तालुका मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब, वकील संघ, व्यापारी असोशिएशन, व्यापारी संघटना, महिला संघटना तसेच शिंपी समाज बांधवांसह वीजवितरण कंपनीचे कर्मचारी, पोलीस दल, सी.गो.पाटील महाविद्यालय, फायर इंजिनियरिंग कॉलेज आदि संस्थेचे विद्यार्थी व शिक्षकांनी वीर जवानास अभिवादन केले. मिलिंदच्या पार्थीवासोबत त्याचा भाऊ व कुटुंबिय होते.

 

LEAVE A REPLY

*