आयुक्तांच्या हल्ल्याची सीआयडी चौकशी करा !

0
धुळे / आयुक्तांच्या निवासस्थावर झालेला हल्ला निषेधार्थ असून या हल्ल्याची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी साबीर मोतेबर यांनी केली.
स्थायी समितीची सभा सभापती कैलास चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत आयुक्तांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा मुद्दा मोतेबर यांनी उपस्थित करुन हल्ल्याचे मुळ कारण शोधावे. आयुक्त चांगले काम करीत आहेत. यामुळे कदाचित हल्ला झाला असावा असे त्यांनी सांगितले.

एलबीटीच्या माध्यमातून सर्वाधिक कर शहरातील व्यापारी भरतात. पालिकेचा गाडा व्यापार्‍यांवर चालतो परंतू व्यापार्‍यांना आव्वाच्या सव्वा एलबीटी भरण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत आहे. असे संजय गुजराथी यांनी सभागृहात सांगितले.

याबाबत पत्राद्वारे माहिती मागविली होती. एलबीटीच्या अधिकार्‍यांनी पुरेशा प्रमाणात माहिती दिली नाही असा आरोप सभापती कैलास चौधरी यांनी केला.

व्यापार्‍यांना कागदपत्र सादर करण्यासाठी 15 दिवसाची मुदत दिली जाते यावेळेत कागदपत्र सादर न करणार्‍या व्यापार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. त्यानंतरही कागदपत्रे सादर न केल्यास व्यापार्‍यांवर कारवाई होते असे सहाय्यक आयुक्त अनुप दुरे यांनी सभागृहात सांगितले.

सभापतींना माहिती दिली जात नसेल तर त्यांचा सत्तेत राहून उपयोग काय? ही सर्व माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागवून सभागृहात मांडू शकतो असे संजय गुजराथी यांनी सांगितले.

गांडूळ खत प्रकल्पाला लागलेली आग ही पुरावा नष्ट करण्यासाठी लावण्यात आली होती असा आरोप संजय गुजराथी यांनी करुन या प्रकरणाची चौकशीची मागणी केली. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे सभापतींनी सभागृहात सांगितले.

LEAVE A REPLY

*