शिंदखेडा के.टी.वेअर ‘ओव्हर फ्लो’

0

शिंदखेडा । प्रतिनिधी-शिंदखेडा शहराला पाणीपुरवठा करणारा कोल्हापूर टाईप बंधारा बुराई नदीला आलेल्या पुरामुळे ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने पूर्वेकडील मातीचा भराव वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

याबाबत बंधार्‍याची पत्रकारांनी पाहणी केली असता धुळे येथील सिंचन विभागाचे अभियंता जे. डी. खैरनार यांच्याशी संपर्क करून कल्पना देण्यात आली. त्यांनीही दखल घेत भेट देऊन पाहणी केली. ताबडतोब जेसीबी उपलब्ध करून भराव करण्यास सुरुवात केली. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे अनेक अडचणी येत आहे.

दरम्यान नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी गावात नदीला येत असलेल्या पुराची कल्पना गावातून लाडस्पीकरच्या माध्यमातून दिल्याने नदी काठावर जागृती व सावधानता निर्माण करण्यात आली आहे.

कोल्हापूर टाईप बंधारा शिंदखेडा शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा करतो. बंधारा ‘ओव्हर फ्लो’ प्रकारामुळे शिंदखेडाकरांमध्ये अत्यंत आनंदी आहे.

आजूबाजूच्या विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. बुराई नदीकाठी राहणारे नागरीक आनंद व्यक्त करीत आहे. बंधार्‍याच्या पूर्वेकडील मातीचा भराव वाहून जाण्याची भीती निर्माण झाली असल्याने काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

*