घनकचरा व्यवस्थापनाची मूलतत्वे अंमलात आणा !

0

धुळे । दि.11 । प्रतिनिधी-घनकचरा व्यवस्थापनाचे मूलतत्वे अंमलात आणावी म्हणजे शहर व स्वच्छ व सुंदर राहील, असे आवाहन घनकचरा नियोजन तांत्रिक तज्ज्ञ लिप्सा साहू यांनी केले.

महापालिकेतर्फे स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा आयएमए हॉल येथे घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन उपायुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यशाळेला शासनामार्फत घनकचरा नियोजन तांत्रिक तज्ज्ञ लिप्सा साहू व दीपिका लेले यांनी मार्गदर्शन केले.

घनकचरा व्यवस्थापनाचे मूलतत्वे तसेच कार्यवाहीची पध्दत व त्यासाठी करावयाची उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अन्य शहरांमध्ये राबविण्यात आलेली कार्यपध्दती व शास्त्रोक्त पध्दतीने कचर्‍याचे विलगीकरण व त्यावरील प्रक्रिया याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

तसेच दैनंदिन कामकाजात येणार्‍या अडचणी याबाबत चर्चेद्वारे संवाद साधण्यात आला. घनकचरा व्यवस्थापनाबाबत पुढील नियोजन व त्या संदर्भातील ई लर्निंग कोर्सेस, पोर्टल रजिस्ट्रेशन याबाबत माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त रवींद्र जाधव यांनी केले. या कार्यशाळेला प्रकल्प संचालक श्रीमती पल्लवी शिरसाठ, नवापूरचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, नंदुरबारचे मुख्याधिकारी गणेश गिरी, शिंदखेड्याचे मुख्याधिकारी अजित निकत, साक्रीचे मुख्याधिकारी मयुर पाटील, कार्यकारी अभियंता बी.जी.भोई, आरोग्याधिकारी महेश मोरे, सहाय्यक आयुक्त अनुप दुरे, सहाय्यक आरोग्याधिकारी रत्नाकर माळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*