शिरपूरात दोन ठिकाणी घरफोड्या : दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

0

धुळे । दि.11 । प्रतिनिधी-शिरपूर शहरात दोन ठिकाणी घरफोड्या झाल्याचे उघडकीस आले असून चोरट्यांनी एक लाख 44 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत शिरपूर शहर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत माहिती अशी की, शिरपूर शहरातील नवकार नगरात प्लॉट नं.16 ब मध्ये जितेंद्र नारायणदास सिंधाणी यांच्या मालकीचे गौरी लेडीज वेअर हे दुकान आहे. अज्ञात चोरट्याने दि.7 ऑक्टोबरच्या रात्री नऊ ते 8 ऑक्टोबरच्या सकाळी 7.30 वाजेदरम्यान दुकानाचे कुलूप तोडून दुकानातून 24 हजार रुपये किंमतीचा टिव्ही, 80 हजार रुपये किंमतीचे कपडे, चार हजार रुपये किंमतीची लेदर बॅग आणि 16 हजार रुपये रोख असा एक लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

याबाबत शिरपूर शहर पोलिस ठाण्यात जितेंद्र नारायणदास सिंधाणी यांनी फिर्याद दिली. भादंवि 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई गुजर हे करीत आहेत.

शिरपूर शहरातील पद्मावती नगरातील प्लॉट नं.12 मध्ये राजसिंग चंद्रसिंग देशमुख हे राहतात. अज्ञात चोरटा दि.3 ते 6 ऑक्टोबरदरम्यान त्यांच्या घरात घुसला व घरातून 15 हजार रुपये किंमतीचा टिव्ही, तीन हजार रुपये किंमतीचे ड्रायफ्रुट, दोन हजार रुपये किंमतीचे बुट असा 20 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत राजसिंग चंद्रसिंग देशमुख फिर्याद दिली. भादंवि 380, 454, 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

मोटारसायकल चोरी – शहरात असलेल्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात प्रमोद अंबादास पारखे यांनी त्यांच्या मालकीची दहा हजार रुपये किंमतीची एमएच 19 बीएक्स 9468 क्रमांकाची मोटारसायकल लावलेली होती. सदर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने दि.7 ऑक्टोबरच्या सकाळी 11 ते 8 ऑक्टोबरच्या सकाळी 11 वाजेदरम्यान चोरुन नेली. याबाबत प्रमोद पारखे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
दुकान फोडले – शहरातील ऐंशीफुटी रोडलगत असलेल्या माणिक मास्टर चौक येथील कोहिनूर बाल सेंटर दुकानाचे शटर अबरार अहमद मो.आरीफ अन्सारी, रा.वडजाईरोड याने फोडून दुकानातून 41 हजार 700 रुपये चोरुन नेले. याबाबत अलताफ शाह हसन शाह फकीर यांनी चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

फवारणी पंपाची चोरी – निकुंभे, ता.धुळे येथे राहणारे शेतकरी दरबारसिंग चितेसिंग गिरासे यांच्या निकुंभे शिवारातील शेतातून फवारणीचा पंप व तीन एचपीची मोटार असा 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल धनराज अर्जुन पाटील, योगेंद्र दाजभाऊ पाटील, अशोक बाबुलाल पाटील यांनी चोरुन नेला, अशी फिर्याद दरबारसिंग गिरासे यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात दिली. भादंवि 379 प्रमाणे तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

बैलांची चोरी – आर्वी, ता.धुळे शिवारातील शेत गट क्र.200/1 मधून संभाजी सुकदेव माळी उर्फ संभाजी मुकरदम याने 50 हजार रुपये किंमतीचे दोन खिल्लारे बैल दि.6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 ते सकाळी सहा वाजेदरम्यान चोरुन नेले, अशी फिर्याद नागेश नामदेव देवरे यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिली. भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलेचा विनयभंग – नरडाणा, ता.शिंदखेडा येथील नवा प्लॉट येथे राहणार्‍या एका 22 वर्षीय महिलेच्या घरात गिरीश उर्फ श्रावण आत्माराम सिसोदे (वय 25) हा गेला. तेथे पीडिताच्या पुतणीचा हात धरुन तिला जमिनीवर फेकून दिले व त्या महिलेचा विनयभंग केला. त्याला त्या महिलेने विरोध केल्यामुळे तिला ढकलून दिले, अशी फिर्याद त्या पीडित महिलेने नरडाणा पोलिस ठाण्यात दिली. भादंवि 354, 448, 427 प्रमाणे गिरीश उर्फ श्रावण आत्माराम सिसोदे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुण बेपत्ता – शिरपूर येथील मच्छीबाजारात राहणारा इरफान शेख मेहतर (वय 22) हा बेपत्ता झाला असून याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*